दुधाला जाड आणि घट्ट साय येणं हे दुधाच्या गुणवत्तेवर नाही तर गरम करण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतींवरही अवलंबून असतं. जर तुम्हाला डेअरीसारखी घट्ट साय हवी असेल तर काही टिप्सचा वापर करायला हवा.घरीच भरपूर साय निघाली तर तुम्ही सायीपासून तूप काढू शकता. भरपूर साय येण्यासाठी दूध आणण्यापासून ते तापवण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तरच दुधावर चांगली साय येते. (How To Make Thick Cream On Milk)
दुधाची निवड
सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुधाचा प्रकार. घट्ट साय येण्यासाठी म्हशीचे फॅट असलेले दूध सर्वोत्तम असते. गाईचे दूध पातळ असल्यानं त्याला फार जाड साय येत नाही. तुम्ही जे दूध घेता त्यात पाणी मिसळलेलं नसावे याची खात्री करा.
दूध मध्यम आचेवर गरम करा
दूध गरम करताना घाई करू नका. दूध मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. जेव्हा दुधाला पहिली उकळ येईल तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी करा. त्यानंतर किमान १० ते १५ मिनिटं दूध मंद आचेवर शिजू द्या. यामुळे दुधातील पाण्याचा अंश कमी होतो आणि दूधात घट्ट फॅट्स जमा व्हायला मदत होते.
दूध उकळत असताना त्यावर एक जाळीदार झाकण ठेवा किंवा पातेल्यात लाकडी चमचा आडवा ठेवा. पूर्ण झाकण ठेवल्यानं वाफ बाहेर जात नाही आणि साय पाणीदार होते. जाळीदार झाकणामुळे वाफ बाहेर पडते आणि सायीचा थर घट्ट होतो.
दूध लगेच फ्रिजमध्ये ठेवू नका.
दूध गरम झाल्यानंतर ते लगेच फ्रिजमध्ये ठेवू नका. दूध पूर्णपणे रूम टेम्चपरेचरवर थंड होऊ द्या. दूध गरम असताना त्यावर ताट झाकू नका. अन्यथा वाफेचे पाणी सायीवर पडून ती पातळ होते. दूध कोमट झाल्यावर त्यावर जाळी ठेवू नका.
दूध गार झाल्यावर ते ४ ते ५ तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमधील गारव्यामुळे दुधातील फॅट्स स्थिर होतात आणि सायीचा एक जाड थर तयार होतो. सकाळी तुम्ही चमच्यानं किंवा हातानं ही साय अख्खी पोळीसारखी काढू शकता.
Web Summary : Get thick cream on milk by choosing the right type, heating it slowly, and cooling it properly. Avoid covering warm milk to ensure a thick layer of cream forms for making ghee.
Web Summary : सही दूध चुनें, धीमी आंच पर गरम करें और ठीक से ठंडा करके दूध पर मोटी मलाई पाएं। घी बनाने के लिए मलाई की मोटी परत सुनिश्चित करने के लिए गर्म दूध को ढकने से बचें।