चहाचा एक घोट घेतला की तरतरी येते. झोप पूर्ण झाली नसेल तरी सकाळी चहा घेतल्यावर अगदी फ्रेश वाटतं. अनेकांची सुरूवात चहा पिऊन होते (Cooking Hacks). चहा प्यायला नाही तर अनेकांना फ्रेश वाटत नाही. घरी केलेला चहा टपरीसारखा घट्ट होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. घरी केलेला चहा पांचट होतो, कधी साखरच खूप लागते किंवा चहा पावडरची चव व्यवस्थित लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (How To Make Tea Masala At Home)
चहा उत्तम होण्यासाठी तुम्ही त्यात कोणते मसाले वापरता हे महत्वाचं असतं. टपरीवाले लोक चहा करताना त्यात खास मसाल्यांचा वापर करतात. हा मसाला तुम्ही घरच्याघरीसुद्धा करू शकता. चहा मसाला करण्यासाठी काय, काय साहित्य लागतं, मसाला करण्याची सोपी कृती पाहूया. रोजच्या कपभर चहात तुम्ही चिमूटभर हा मसाला घातला तरी चहाची चव अफलातून लागेल. असा चहा तुम्हाला पुन्हा पुन्हा प्यावासा वाटेल. (Tea Masala Recipe)
चहा मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
सुंठ-५० ग्रॅम
हिरवी वेलची-२५ ग्रॅम
मिरी-१० ग्रॅम
लवंग-१० ग्रॅम
दालचिनी -१० ग्रॅम
चहा मसाला करण्याची सोपी कृती
गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवा आणि गॅस मंद ठेवा. सुंठ वगळता सर्व साहित्य एकत्र कढईत घाला. सुंठेचे तुकडे मोठे असल्यास ते नंतर भाजले तरी चालतील. हे सर्व मसाले मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे हलके भाजून घ्या. मसाल्यातून छान सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा. मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या. मसाला थंड होण्यासाठी एका ताटात काढून ठेवा.
भाजलेले आणि थंड झालेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात (Mixer Jar) घाला. हे मिश्रण बारीक पावडर (Powder) होईपर्यंत दळून घ्या. मसाला जास्त वेळ दळल्यास तो तेल सोडतो, म्हणून थांबून थांबून दळा. दळलेला मसाला चाळण्याची गरज नाही, कारण आपल्याला चहामध्ये संपूर्ण मसाल्याचा अर्क हवा आहे. तयार केलेला मसाला एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. हा मसाला ६ महिने व्यवस्थित टिकतो.
Web Summary : Tired of bland tea? This homemade tea masala recipe guarantees a strong, flavorful cup. Simply roast and grind spices like ginger, cardamom, pepper, cloves, and cinnamon. Add a pinch to your tea for an amazing taste. Store in an airtight container.
Web Summary : फीकी चाय से परेशान हैं? यह होममेड चाय मसाला रेसिपी कड़क और स्वादिष्ट चाय की गारंटी देती है। अदरक, इलायची, काली मिर्च, लौंग और दालचीनी जैसे मसालों को भूनकर पीस लें। अद्भुत स्वाद के लिए अपनी चाय में एक चुटकी डालें। एक एयरटाइट कंटेनर में स्टोर करें।