Lokmat Sakhi >Food > पिठलं खमंग-झणझणीत होत नाही? ‘ही’ रेसिपी घ्या, पिठलं होईल चविष्ट, गाठी-गोळेही होणार नाहीत..

पिठलं खमंग-झणझणीत होत नाही? ‘ही’ रेसिपी घ्या, पिठलं होईल चविष्ट, गाठी-गोळेही होणार नाहीत..

How To Make Tasty Delicious Besan: अतिशय खमंग चवीचं झणझणीत पिठलं जर जेवणात असेल तर भाजी, आमटी अशा पदार्थांची आठवणही येत नाही.(pithala recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 14:27 IST2025-05-17T13:30:00+5:302025-05-17T14:27:44+5:30

How To Make Tasty Delicious Besan: अतिशय खमंग चवीचं झणझणीत पिठलं जर जेवणात असेल तर भाजी, आमटी अशा पदार्थांची आठवणही येत नाही.(pithala recipe in marathi)

how to make tasty delicious besan, pithala recipe in marathi, how to avoid lumps in pithala or besan? | पिठलं खमंग-झणझणीत होत नाही? ‘ही’ रेसिपी घ्या, पिठलं होईल चविष्ट, गाठी-गोळेही होणार नाहीत..

पिठलं खमंग-झणझणीत होत नाही? ‘ही’ रेसिपी घ्या, पिठलं होईल चविष्ट, गाठी-गोळेही होणार नाहीत..

Highlightsमिरच्यांचे तुकडे, लसूणाचे तुकडे घालून पिठल्याला म्हणावा तसा स्वाद येत नाही. जेव्हा तुम्ही मिरच्या आणि लसूण वाटून घेऊन पिठल्यात घालता तेव्हा ते पिठलं जास्त चवदार होतं.

बऱ्याचदा असं होतं की घरात कोणतीही भाजी नसते. किंवा भाज्या असल्या तरी त्याच त्या चवीच्या नेहमीच्या भाज्या खाण्याचा खूप कंटाळा येतो. अशावेळी जेवणात वेगळ्या चवीचं काहीतरी करावं असं वाटतं. आता अशा परिस्थितीत सगळ्यात सोपा आणि घरातल्या जवळपास सगळ्यांनाच आवडणारा एक पदार्थ म्हणजे पिठलं. पण काही जणींचं असं म्हणणं आहे की त्यांनी केलेलं पिठलं काही चवदार होत नाही (how to make tasty delicious besan?). शिवाय पिठलं करताना त्यात गोळेही होतात (how to avoid lumps in pithala or besan?). तुम्हालाही असाच अनुभव येत असेल तर त्यासाठी काय करायचं ते पाहा..(pithala recipe in marathi)

खमंग पिठलं करण्याची रेसिपी

 

साहित्य

अर्धी वाटी बेसन

३ ते ४ हिरव्या मिरच्या

१ इंच आल्याचा तुकडा

देखण्या पैठणीवरचं ब्लाऊजही सुंदरच हवं.. बघा ७ स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स- पैठणी आणखी उठून दिसेल

८ ते १० लसूण पाकळ्या

१ मध्यम आकाराचा कांदा

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

फोडणसाठी १ चमचा तेल, मोहरी, जिरे आणि हिंग

चवीनुसार मीठ 

 

कृती 

सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये तेल, मोहरी, हिंग, जिरे घालून फोडणी करून घ्या.

यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन पीठ घ्या. साधारण जेवढं पीठ घ्याल त्याच्या तीनपट किंवा चारपट त्यात पाणी घालावं लागतं. पण पीठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालावं.

गारेगार मँगो मस्तानीची मस्त सोपी रेसिपी! आंब्याचा सिझन संपण्यापूर्वी मस्तानी एकदा तरी प्यायलाच हवी..

शिवाय पाणी घालत असताना व्हिस्क वापरून पीठ सारखं गोलाकार दिशेने फिरवत राहावं. असं केल्याने पिठल्यामध्ये गाठी हाेत नाही. हलवून घेऊन सगळं पीठ एकसारखं करून घ्यावं.

आता तोपर्यंत कढईतली फोडणी झाली असल्यास त्यात बारीक चिरलेला कांदा घालूून परतून घ्यावं. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या. कांदा परतून झाल्या की हे वाटण कढईमध्ये घालून परतून घ्यावं. 

 

मिरच्यांचे तुकडे, लसूणाचे तुकडे घालून पिठल्याला म्हणावा तसा स्वाद येत नाही. जेव्हा तुम्ही मिरच्या आणि लसूण वाटून घेऊन पिठल्यात घालता तेव्हा ते पिठलं जास्त चवदार होतं.

रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी 'हे' काम करा- १० मिनिटांत दुखणं थांबेल

आलं- लसूण- मिरचीचं वाटण परतून झाल्यानंतर पाण्यात कालवलेलं बेसन पीठ कढईमध्ये हळूहळू घालावं आणि ते गोलाकार दिशेने हलवत राहावं. यामुळे पिठल्यामध्ये गोळे होत नाही. चवीनुसार मीठ घालून कढईवर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या. त्यानंतर बारीक चिरलेली काेथिंबीर घालून गॅस बंद करा. पिठलं छान चवदार, खमंग होईल. 

 

Web Title: how to make tasty delicious besan, pithala recipe in marathi, how to avoid lumps in pithala or besan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.