ऑफिसहून घरी आल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर १ कप गरमागरम चहा मिळाला तर दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते. प्रत्येकालाच वेगवेगळ्या चवीचा चहा आवडतो. काहीजण एकदम कडक चहा पितात तर काहीजणांना टपरीवर मिळतो तसा, ढाब्यावर मिळतो तसा चहा प्यायला आवडतो. (How To Make Tapri Style Chai At Home)
परफेक्ट चहा करायला प्रत्येकालाच जमतं असं नाही. बऱ्याचजणांना चहाचं प्रमाण माहिती नसतं. दूध, चहा पावडर, पाणी आणि आलं किती घालावं याचं प्रमाणही माहिती नसतं. टपरीवर मिळतो तसा परफेक्ट रंगाचा, फक्कड चवीचा चहा करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. रोजच्या मोजक्या साहित्यात तुम्ही उत्तम चहा करू शकता. (Milk Tea Making Tips)
परफेक्ट चहा करण्याच्या सोप्या स्टेप्स पाहू (How To Make Perfect Tea)
जर तुम्हाला २ कप कडक चहा करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये जवळपास दीड कप पाणी उकळवायला ठेवा. जेव्हा चहा उकळेल तेव्हा त्यात २ टिस्पून चहा पावडर घाला. नंतर चहाचा मसाला घाला. ज्यामुळे चहाची चव वाढेल. जवळपास १ इंच आल्याचा तुकडा कुटून मग चहाच्या पाण्यात घाला.
चहा पावडर आणि पाणी जवळपास १ ते २ मिनिटं उकळवून घ्या. नंतर यात १ कपभर दूध घाला. दूध घातल्यानंतर चहाला व्यवस्थित उकळ येऊ द्या. २ ते ३ मिनिटांसाठी मंद आचेवर चहा व्यवस्थित उकळवून घ्या. नंतर यात दोन टिस्पून साखर घालून चहा २ मिनिटं उकळवा. या पद्धतीनं चहा एकदम परफेक्ट कडक होईल. गरमागरम चहा गाळून प्यायला सुरूवात करा.
ढाबास्टाईल चहा कसा करायचा? (How To Make Dhaba Style Tea)
ढाबास्टाईल चहाची चव वेगळीच असते. ढाब्यावरचे चहा विक्रेते दूध आणि पाणी मिसळून आधी उकळवून घेतात. नंतर जितके कप चहा करायचा आहे त्यासाठी लागणारी चहा पावडर आणि साखर एकत्र उकळवून घेतात. चहाला उकळ आल्यावर त्यात आलं आणि चहा मसाला घालतात. हाय फ्लेमवर चहा ३ ते ४ उकळ येईपर्यंत व्यवस्थित गरम करतात नंतर चहा तयार होतो.
Web Summary : Make perfect Tapri-style tea at home by boiling water, tea powder, and ginger. Add milk and sugar, simmer, and enjoy. Dhaba-style involves pre-boiling milk and water, then adding tea powder, sugar, and masala for a strong flavor.
Web Summary : घर पर टपरी-शैली की चाय बनाने के लिए पानी, चाय पाउडर और अदरक उबालें। दूध और चीनी डालकर उबाल लें। ढाबा-शैली में दूध और पानी पहले उबालें, फिर चाय पाउडर, चीनी और मसाला डालकर तेज स्वाद बनाएँ।