बरेचदा आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ग्रेव्हीच्या भाज्यांसोबत खाण्यासाठी रोटी किंवा नान ऑर्डर करतो. गरमागरम, मऊ, कुरकुरीत आणि फुगलेला पांढराशुभ्र नान खाण्याची मज्जाच वेगळी असते. कोणतीही भाजी किंवा ग्रेव्ही नानशिवाय अधुरीच वाटते. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारा नान आपण अगदी तसाच घरच्याघरी (How To Make Tanduri Naan At Home) देखील तयार करू शकतो. हॉटेल स्टाईल नान घरीच तयार करण्यासाठी (soft fluffy naan at home without tandoor) ओव्हन किंवा तंदूरची गरज नाही, अगदी उपलब्ध असलेल्या साहित्यात देखील (how to make restaurant style naan at home) झापण झटपट नान तयार करु शकतो. आपला नेहमीचा चपातीचाच तवा वापरुन देखील आपण नान घरीच पटकन तयार करू शकतो.
स्वयंपाकघरातील साध्या तव्यावर जबरदस्त हॉटेल स्टाईल नान तयार करण्याची सोपी आणि अचूक पद्धत पाहा. रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या नानचा सुगंध आणि टेस्ट पाहून आपल्याला नेहमी वाटतं – "हे तर घरी कधीच तयार करता येणार नाही!" पण खरी गोष्ट अशी की थोडं योग्य मोजमाप आणि ट्रिक माहिती असेल तर अगदी हॉटेलसारखा मऊ, फुललेला नान घरच्या स्वयंपाकघरात तयार करता येतो. रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या नानची तीच चव आणि पोत घरी तयार केलेल्या नानला यावी यासाठी ही सोपी हॉटेल स्टाईल नान बनवण्याची रेसिपी आहे खास व झक्कास....
साहित्य :-
१. मैदा - ५०० ग्रॅम
२. दूध - १/२ कप
३. पिठीसाखर - १ टेबलस्पून
४.दही - १/४ कप
५. तेल - २ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून
८. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
९. कोथिंबीर - ३ ते ४ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१०. कलोंजी - २ ते ३ टेबलस्पून
११. पाणी - गरजेनुसार
गॅस शेगडी दिसेल नव्यासारखी लख्ख! ४ टिप्स - न घासताच चिकट - तेलकट डाग निघतील सहज...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये, मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर व बेकिंग पावडर घाला. त्यानंतर त्यात पिठीसाखर, तेल, चवीनुसार मीठ घालावे.
२. सगळे जिन्नस कोरड्या पिठात व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्यावेत.
३. मग या मिश्रणात दही व गरजेनुसार दूध घालूंन नान तयार करण्यासाठी मऊसूत अशी कणीक मळून घ्यावी.
४. कणिक घट्ट मळून झाल्यावर त्यावर वरून थोडेसे तेल लावून कणीक १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यावी.
५. मग तयार कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून, चपातीप्रमाणेच नान लाटून घ्यावेत.
वाटीभर साबुदाण्याचे गोड लाडू! तोंडात टाकताच विरघळणाऱ्या लाडूची चवचं न्यारी - उपवास होईल खास...
६. नान लाटून पूर्ण झाल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर व कलोंजी भुरभुरवून घालावी. त्यानंतर पुन्हा एकदा हलकेच लाटण्याने नान पुन्हा लाटून घ्यावा.
७. मग नान उलटा करुन (खालची बाजू वर करून) त्यावर किंचित पाणी घालूंन ते व्यवस्थित पसरवून घ्यावे.
८. ज्या बाजूला पाणी लावले त्याच बाजूने नान थेट तव्यावर ठेवून व्यवस्थित भाजून घ्यावा.
अशाप्रकारे, घरच्याघरीच रेस्टॉरंट स्टाईल मस्त खुसखुशीत, कुरकुरीत असा नान खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भाजीसोबत मऊसूत नान खायला अधिकच चविष्ट लागतो.