Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात दही भात खाण्याच्या पारंपरिक पद्धतीचे वाचा फायदे, पाहा ५ मिनिटांची फक्कड दहीभात रेसिपी

उन्हाळ्यात दही भात खाण्याच्या पारंपरिक पद्धतीचे वाचा फायदे, पाहा ५ मिनिटांची फक्कड दहीभात रेसिपी

How to Make Summer Special Curd Rice?: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही- भात खायला आवडत असेल तर बघा ही एक मस्त रेसिपी...(curd rice recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 15:29 IST2026-04-06T15:28:29+5:302026-04-06T15:29:14+5:30

How to Make Summer Special Curd Rice?: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही- भात खायला आवडत असेल तर बघा ही एक मस्त रेसिपी...(curd rice recipe)

how to make summer special curd rice, how to make summer special dahi bhat, curd rice recipe, dahi bhat recipe in Marathi | उन्हाळ्यात दही भात खाण्याच्या पारंपरिक पद्धतीचे वाचा फायदे, पाहा ५ मिनिटांची फक्कड दहीभात रेसिपी

उन्हाळ्यात दही भात खाण्याच्या पारंपरिक पद्धतीचे वाचा फायदे, पाहा ५ मिनिटांची फक्कड दहीभात रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांत भूक कमी होते. त्यामुळे खूप जेवण नकोसं वाटतं. पण त्या जेवणात जर चटण्या, लाेणची किंवा दही भातासारखे काही खास पदार्थ असतील तर मग मात्र दोन घास का होईना, पण जरा बरं जेवण जातं. एरवी बरेच लोक पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात दही भात खात नाहीत. पण उन्हाळ्यात मात्र बहुतांश घरांमध्ये दही भात आवर्जून खाल्ला जातो. तुम्हालाही दही भात आवडत असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने तो करून पाहा (How to Make Summer Special Curd Rice?). अतिशय चवदार आणि पौष्टिक होईल.(dahi bhat recipe in Marathi)

 

दही भात कसा करावा?

दही भातासाठी एकदम गरम भात घेण्याऐवजी थोडा थंड भातच घेतलेला जास्त चांगला. तो भात हातानेच थोडा मोकळा करून घ्या. त्यात भरपूर दही घाला. दही खूप आंबट नसावं. ताजं आणि गोड दही घ्या. त्यामध्ये मीठ, थोडीशी साखर आणि ताजी साय घाला. भात हलवून सगळे पदार्थ छान एकजीव करून घ्या.

उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

यानंतर छोटी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कडिपत्ता, उडीद डाळ, शेंगदाणे घालून तुपाची फोडणी करून घ्या. ही फोडणी दही कालवलेल्या भातावर घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की मस्त चवदार दही भात तयार. 

 

दही भात खाण्याचे फायदे

१. जेवणाचा शेवट दही भात खाऊन केल्यास जेवण पचायला मदत होते.

२. भातामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. तर दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम चांगले होते.

World Health Day 2026: सतत थकवा-त्वचा आणि केसांच्या समस्या वाढल्या, ‘हे’ सप्लिमेण्ट्स घ्या- नेहमीच उत्साही राहाल

३. उष्णता वाढली असेल, पोटात जळजळ होत असेल, जुलाब होत असतील तर अशावेळीही दहीभात खाणे फायद्याचे ठरते. कारण अंगातली उष्णता कमी करण्यासाठी दही भात उपयुक्त ठरतो.  
 

Web Title: how to make summer special curd rice, how to make summer special dahi bhat, curd rice recipe, dahi bhat recipe in Marathi