Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी करा खमंग भरलेली मिरची; सोपी रेसिपी-जिभेला येईल चव

वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी करा खमंग भरलेली मिरची; सोपी रेसिपी-जिभेला येईल चव

How To Make Stuff Mirchi At Home : भरलेली मिरची करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत  घ्यावी लागणार नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही मिरच्या करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 22:07 IST2026-02-22T19:45:21+5:302026-02-22T22:07:00+5:30

How To Make Stuff Mirchi At Home : भरलेली मिरची करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत  घ्यावी लागणार नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही मिरच्या करू शकता.

How To Make Stuff Mirchi At Home : Stuffed Chilies Recipe How To Make Stuff Mirchi at Home | वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी करा खमंग भरलेली मिरची; सोपी रेसिपी-जिभेला येईल चव

वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी करा खमंग भरलेली मिरची; सोपी रेसिपी-जिभेला येईल चव

जेवणात कितीही चांगली भाजी  असेल किंवा कितीही गोड पदार्थ असोत. मिरचीचं लोणचं किंवा भरलेली मिरची जर ताटात असेल तर पदार्थाची चव दुप्पटीनं वाढते. भरलेल्या मिरच्यांची ही रेसिपी करण्यासाठी साधारणपणे मोठ्या आणि कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या वापरल्या जातात.  भरलेली मिरची करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत  घ्यावी लागणार नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही मिरच्या करू शकता. (How To Make Stuff Mirchi At Home)

भरलेल्या मिरच्या करण्यासाठी  पूर्व तयारी काय करावी?

सर्वात आधी मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या आणि त्या मधून उभ्या चिरून घ्या. जेणेकरून त्यात व्यवस्थित मसाला भरता येईल. जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर मिरचीतील बिया काढून टाकू शकता. या रेसिपीचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यातील मसाला. 


भरलेली मिरची करण्यासाठी मिरचीचं सारण असं तयार करा

हा मसाला करण्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, दोन ते तीन मोठे चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, धणे-जीरं पूड आणि चवीनुसार मीठ एकत्र करा. यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं-लसणाची पेस्ट आणि चटपटीत चव येण्यासाठी थोडा लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घाला. सर्व मिश्रण थोडं तेल घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. जेणेकरून मसाला कोरडा राहणार नाही. 

तयार केलेला मसाला प्रत्येक मिरचीमध्ये दाबून व्यवस्थित भरा. गॅसवर एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जीरं आणि हिंगाची फोडणी द्या. त्यानंतर भरलेल्या मिरच्या पॅनमध्ये ठेवा. गॅसची फ्लेम मंद ठेवून मिरच्यांवर झाकण ठेवा आणि वाफेवर ५ ते ७ मिनिटं शिजू द्या. मध्ये मध्ये मिरच्यांची बाजू पलटत राहा. 

जेणेकरून त्या सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजल्या जातील आणि मसालाही छान शिजेल. तेव्हा मिरच्यांच्या रंग बदलेल आणि मऊ होतील. तुम्ही गरमागरम भरलेली मिरची पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता.

Web Title: How To Make Stuff Mirchi At Home : Stuffed Chilies Recipe How To Make Stuff Mirchi at Home