Lokmat Sakhi >Food > खाऊन पाहा खमंग स्प्राऊट पराठा! एकदा खाल्ला तर रोज मागाल, कडधान्याचा चविष्ट झटपट पदार्थ

खाऊन पाहा खमंग स्प्राऊट पराठा! एकदा खाल्ला तर रोज मागाल, कडधान्याचा चविष्ट झटपट पदार्थ

How To Make Sprout Paratha: मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी स्प्राऊट पराठा हा एक खूप छान पदार्थ आहे.(super healthy recipe of making sprout paratha)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 14:02 IST2025-01-16T09:16:44+5:302025-01-16T14:02:27+5:30

How To Make Sprout Paratha: मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी स्प्राऊट पराठा हा एक खूप छान पदार्थ आहे.(super healthy recipe of making sprout paratha)

how to make sprout paratha, super healthy recipe of making sprout paratha, best menu for kids tiffin, healthy recipe for breakfast | खाऊन पाहा खमंग स्प्राऊट पराठा! एकदा खाल्ला तर रोज मागाल, कडधान्याचा चविष्ट झटपट पदार्थ

खाऊन पाहा खमंग स्प्राऊट पराठा! एकदा खाल्ला तर रोज मागाल, कडधान्याचा चविष्ट झटपट पदार्थ

Highlightsहे पराठे तुम्ही सॉस, लोणचं, शेंगदाण्याची चटणी यासोबतही खाऊ शकता. 

मुलांना डब्यात काय द्यावं हा प्रश्न अनेकदा पडतो. कारण मुलांना तेच ते भाजी पोळी रोजच दिलेलं आवडत नाही. त्यामुळेच पौष्टिक पण असावा, चवीला वेगळा पण असावा आणि शिवाय करायलाही सोपा असावा असा पदार्थ जवळपास सगळ्याच जणी शोधत असतात (best menu for kids tiffin). तुम्हीही अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या शोधात असाल तर हा स्प्राऊट पराठा तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. नाश्त्यासाठीही हा पदार्थ अगदी उत्तम आहे (healthy recipe for breakfast). शिवाय रात्रीही थोडीशीच भूक असेल तर त्यावेळी खायलाही तुम्ही स्प्राऊट पराठा करू शकता.(how to make sprout paratha?)

स्प्राऊट पराठा करण्याची रेसिपी

 

साहित्य

भिजवलेली मटकी, मूग, चवळी असं सगळं मिळून एक वाटी

ज्वारी आणि गव्हाचं पीठ प्रत्येकी एकेक वाटी

बेसन पीठ अर्धी वाटी

भाग्यश्रीने सांगितलं फक्त ३ पदार्थ वापरून कशी करायची तिळाची चवदार वडी- बघा इंस्टंट रेसिपी 

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

२ टीस्पून आलं- लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट

१ मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो 

चवीनुसार मीठ आणि १ टेबलस्पून तेल

 

कृती 

सगळ्यात आधी रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेली कडधान्ये मिक्सरमधून बारीक करून घ्या.

कांदा आणि टोमॅटो किसून घ्या. आता कडधान्यांचं पीठ आणि किसलेला कांदा- टोमॅटो एकत्र करा आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून  ते १० मिनिटं झाकून ठेवा. असं केल्याने कांदा- टोमॅटोला पाणी सुटतं.

टोमॅटो खाण्याची योग्य पद्धत- एक्सपर्ट सांगतात 'या' पद्धतीने टोमॅटो खाल्ल्यास मिळतील भरपूर फायदे

आता त्या पाण्यात तिन्ही पीठं, हळद, मीठ, कोथिंबीर, आलं- लसूण पेस्ट घालून पीठ मळून घ्या आणि १० मिनिटे झाकून ठेवा. 

नेहमीप्रमाणे जसे पराठे लाटतो तसेच पराठे लाटा आणि खमंग भाजून घ्या.

हे पराठे तुम्ही सॉस, लोणचं, शेंगदाण्याची चटणी यासोबतही खाऊ शकता. 


 

Web Title: how to make sprout paratha, super healthy recipe of making sprout paratha, best menu for kids tiffin, healthy recipe for breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.