दक्षिण भारतीय (South Indian Food) पदार्थांमध्ये सांबारला एक स्थान आहे. इडली, डोसा, वडा किंवा साधा भात असो सांबारशिवाय या पदार्थांची मजा अपूर्ण आहे. अनेकांना हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सांबारची चव खूपच आवडते. पण घरी तसं करता येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. काही सोप्या टिप्स, सिक्रेट मसाला वापरून हॉटेलसारखा दाट आणि चविष्ट सांबार बनवू शकता. (How To Make South Indian Hotel Style Sambar At Home)
डाळीचे प्रमाण
हॉटेलसारखा सांबार घरी करण्यासाठी तूर डाळ अधिक शिजवून व्यवस्थित घोटून घ्या. काही लोक यात मूग डाळ देखील घालतात. ज्यामुळे सांबारला छान दाटसरपणा येतो. डाळ चांगली मऊ शिजणं महत्वाचं आहे.
भाज्यांची निवड
सांबारमध्ये भाज्यांचे मिश्रण महत्वाचे आहे. भोपळा, दूधी, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो आणि वांगे या भाज्यांचा वापर केल्यास सांबारची चव खूप वाढते. भाज्या समान आकाराच्या कापून घ्या आणि त्या जास्त गाळू नका त्या किंचित अख्ख्या राहायला हव्यात.
मंगळसुत्राच्या २ वाट्या सासर माहेरची खूण! नववधूसाठी छोटं वाटी मंगळसूत्र; १० युनिक पॅटर्न
सांबार मसाला
हॉटेलच्या सांबारची खरी चव त्याच्या ताज्या सांबार मसाल्यामध्ये असते. यासाठी धणे, जिरं, मेथी दाणए, उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या,कढीपत्ता, हिंग हे सर्व साहित्य भाजून घ्या आणि नंतर खोबऱ्यासोबत बारीक वाटून घ्या. हा ताजा मसाला सांबारला खास चव आणि सुगंध देतो.
चिंच आणि गूळ
सांबारला आंबट गोड चव देण्यासाठी हे दोन घटक खूप महत्वाचे आहेत. चिंचेचा कोळ आणि थोडा गूळ घातल्यानं सांबारची चव संतुलित राहते आणि हॉटेलसारखी विशिष्ट चव येते.
फुग्यांच्या शॉर्ट बाह्यांचे शिवा ब्लाऊज; ८ नवे पॅटर्न, ब्लाऊज सुंदर दिसेल- मिळेल युनिक लूक
करण्याची पद्धत
प्रथम डाळ शिजवून घ्या. एका मोठ्या भांड्यात तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करा. नंतर कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्या परतवून घ्या. त्यात हळद, तिखट आणि तयार सांबार मसाला घालून भाज्या शिजवून घ्या. भाज्या अर्धवट शिजल्यावर शिजवलेली डाळ, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून सांबारला चांगली उकळी आणा. चवीनुसार मीठ घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सांबार सर्व्ह करा.
