Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > लग्नात नाश्त्याला मिळतं तसं मऊमऊ उप्पीट करण्याची परफेक्ट रेसिपी, ९ सोप्या टिप्स- खा मनसोक्त

लग्नात नाश्त्याला मिळतं तसं मऊमऊ उप्पीट करण्याची परफेक्ट रेसिपी, ९ सोप्या टिप्स- खा मनसोक्त

How To Make Soft Upma at Home : या टिप्स जर तुम्ही उप्पीट करताना वापरल्या तर परफेक्ट नाश्ता घरीच बनेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:37 IST2026-01-30T15:15:02+5:302026-01-30T16:37:28+5:30

How To Make Soft Upma at Home : या टिप्स जर तुम्ही उप्पीट करताना वापरल्या तर परफेक्ट नाश्ता घरीच बनेल.

How To Make Soft Upma at Home : Upit Recipe At Home Upit Recipe | लग्नात नाश्त्याला मिळतं तसं मऊमऊ उप्पीट करण्याची परफेक्ट रेसिपी, ९ सोप्या टिप्स- खा मनसोक्त

लग्नात नाश्त्याला मिळतं तसं मऊमऊ उप्पीट करण्याची परफेक्ट रेसिपी, ९ सोप्या टिप्स- खा मनसोक्त

सकाळच्या नाश्त्याला किंवा भुकेच्या वेळेत मऊ, लुसलुशीत  उप्पीट खाण्याची मजाच काही वेगळीच असते. बऱ्याचदा उपीट कोरडे होते किंवा त्याचे गोळे होतात (How Upit Recipe). हॉटलसारखे मऊसूत आणि जिभेवर विरघळणारे उपीट करण्यासाठी  काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता (How To Make Soft Upma at Home).  या टिप्स जर तुम्ही  उप्पीटकरताना वापरल्या तर परफेक्ट नाश्ता घरीच बनेल. (Upit Recipe)

रव्याची निवड आणि भाजण्याची पद्धत

नेहमी बारीक रवा वापरा. रवा कोरडा न भाजता १ ते २ चमचे साजूक तूप घालून मंद आचेवर भाजून घ्या. रवा लाल करायचा नाही. फक्त त्याचा खमंग वास येईल.

 मऊसूत  उप्पीटाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे प्रमाण. साधारणपणे १ वाटी रव्यासाठी ३ वाट्या पाणी वापरावे. जर तुम्हाला जास्त मऊ हवे असेल तर पाण्याचे प्रमाण ३.५ वाट्या इतकं ठेवावे.

रव्यामध्ये कधीही थंड किंवा कोमट पाणी घालू नका. पाणी एका बाजूला चांगलं उकळवून घ्या आणि मगच फोडणीत घाला. यामुळे रवा छान फुलतो आणि गुठळ्या होत नाही.

 फोडणीत मोहोरी, जीरं, कढीपत्ता आणि उडीद डाळ घातल्यानं छान दाणेदारपणा येतो. कांदा जास्त लाल करू नका. तो फक्त पारदर्शक झाला की त्यात पाणी ओता.

 उप्पीटाची चव संतुलित करण्यासाठी त्यात अगदी अर्धा चमचा साखर घाला. यामुळे उपीटाला एक वेगळी चव येते आणि ते घशात अडकल्यासारखे वाटत नाही.

पाणी उकळतानाच त्यात थोड लिंबू पिळा. यामुळे उपीट पांढरेशुभ्र दिसते आणि चवीलाही चटपटीत लागते.

पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा. एका हातानं रवा हळूहळू घाला आणि दुसऱ्या हातानं चमच्यानं ढवळत राहा.  यामुळे गुठळी होणार  नाही.

रवा मिक्स करून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटं मंद आचेवर वाफ येऊ द्या. वाफेमुळे रवा आतपर्यंत नीट शिजतो.

  उप्पीट तयार झाल्यावर वरून भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घाला. यामुळे ओलावा टिकून राहतो. 

Web Title : घर पर बनाएं मुलायम उपमा: 9 टिप्स, मिलेगा परफेक्शन।

Web Summary : इन आसान टिप्स से घर पर बनाएं मुलायम उपमा। बारीक सूजी का प्रयोग करें, घी में भूनें, और 1:3 का सूजी-पानी का अनुपात बनाए रखें। गरम पानी, तड़का, चीनी, नींबू डालें और ढककर पकाएं। धनिया और नारियल से सजाएं।

Web Title : Make soft, fluffy Upma at home: 9 tips for perfection.

Web Summary : Enjoy soft Upma at home with these simple tips. Use fine semolina, roast in ghee, and maintain a 1:3 semolina-to-water ratio. Add hot water, tempering, sugar, lemon, and cook covered. Garnish with coriander and coconut.