Join us

थंडीत इडलीचं पीठ फुलतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा ५ गोष्टी; सॉफ्ट होतील इडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:10 IST

How To Make Soft Spongy Idli (Idli Kashi Kartat) : थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ नीट फुलतंच नाही अशी तक्रार अनेकांची असते. इडलीचं पीठ फुलण्यासाठी काही खास ट्रिक्स पाहूया.

सकाळचा नाश्ता (Breakfast) असो की संध्याकाळचा नाश्ता गरम इडली सांबार आणि नारळाची चटणी सर्वांनाच खायला आवडते. इडली बिना तेलाचा पदार्थ असल्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी एक परफेक्ट डीश आहे (Idli Making Tips). दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतभरात हा नाश्ता आवडीने खाल्ला जातो.  हळूहळू संपूर्ण जगभरात हा नाश्ता प्रसिद्ध झाला आहे. परफेक्ट स्पंजी इडली बनवणं प्रत्येकालच जमत असं नाही. थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ नीट फुलतंच नाही अशी तक्रार अनेकांची असते. इडलीचं पीठ फुलण्यासाठी काही खास ट्रिक्स पाहूया. (How To Make Soft Spongy Idli)

मऊ, स्पंजी इडली बनवण्यासाठी  टिप्स

इडलीच्या पीठात तांदूळ, डाळ आणि रवा मिसळून बेकिंग सोडा घाला. इडली बनवताना जास्त सॉफ्ट आणि स्पंजी होण्यासाठी तुम्ही त्यात हिरव्या रंगाचं ग्रीन रंगाचं इनोचं पाकीट घालू शकता. हे पाकीट पिठात घातल्यानंतर मऊ,  मोकळ्या फुललेल्या इडल्या तयार होतील.

पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवा

इडली सॉफ्ट आणि स्पंजी बनवण्यासाठी थंडीच्या दिवसांत खूपच जास्त वेळ लागतो.  तापमान कमी असल्यामळे बॅटर लवकर तयार होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत पीठ आंबवण्यासाठी वेळ लागत नाही. हे बॅटर चांगले आंबवण्यासाठी गरम जागेवर हवाबंद डब्यात झाकण लावून ठेवा.

पोहे मिसळा

एक्स्ट्रा सॉफ्ट स्पंजी इडली करण्यासाठी एका वाटीत पोहे भिजवून बॅटरसोबत मिसळा. पोह्याचा वापर इडली आणि डोश्याच्या बॅटरमध्ये केल्यास इडल्या अधिकच सॉफ्ट बनतात.

रश्मिका मंदानाचे १० सिल्क साडी लूक; लग्नाला जाताना नेसा या साड्या, सुंदर-आकर्षक दिसाल

रवा आणि डाळीचं प्रमाण याकडे लक्ष द्या

रवा, डाळ आणि तांदूळाच्या रेश्योवर खास लक्ष द्या. यात तुम्ही कमी जास्त करू शकता. इडली तयार झाल्यानंतर चांगली फुलेल. सॉफ्ट स्पंजी बनेल.

दही मिसळा

दही मिसळल्यानं पीठ व्यवस्थित आंबेल. तितकीच इडली सॉफ्ट, स्पंजी बनेल. दही तुम्ही आपल्या हिशोबानं घालू शकता. जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही आंबट दह्याचा वापर करू शकता. जर तुम्ही आंबट खात नसाल तर ताज्या दह्याचा वापर करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स