Join us

Rice Bhakri : मोदकाच्या उरलेल्या पिठाची मऊ, लुसलुशीत भाकरी; पाहा सोपी रेसिपी-झटपट होतील भाकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:06 IST

How To Make Soft Rice Bhakri : तांदळाची भाकरी करण्याची सोपी साधी रेसिपी पाहूया. (How To Make Soft Rice Bhakri)

मोदक (Modak) म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ. गणेश चतुर्थीला अनेकांच्या घरी उकडीचे मोदक बनवले जातात. (Coking Hacks) उकडीचे मोदक करून झाल्यानंतर  तांदळाचं पीठ उरलं असेल तर ते वाया घालवण्यापेक्षा तुम्ही या पिठाची मऊसूत तांदळाची भाकरी बनवू शकता. तांदळाची भाकरी योग्य पद्धतीनं केली तर ती सोपी आहे आणि खायलाही रूचकर लागते. तांदळाची भाकरी करण्याची सोपी साधी रेसिपी पाहूया. (How To Make Soft Rice Bhakri)

साहित्य-

1) मोदकांचे शिल्लक राहिलेले पीठ

2) चवीनुसार मीठ

3) गरजेनुसार पाणी

भाकरी करण्याची सोपी पद्धत

सगळ्यात आधी शिल्लक राहिलेलं मोदकांचं पीठ एका मोठ्या भांड्यात घ्या. जर पीठ थोडं कडक झालं असेल तर त्यात कोमट पाणी तेल किंवा तूप घालू व्यवस्थित मळून घ्या. पीठ एकजीव, गुळगुळीत होईपर्यंत मळा. तुम्ही पीठ जितकं छान मळाल तितकीच भाकरी चांगली येईल.

नंतर मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या. एका ताटात किंवा पोळ पाटावर तांदळाचे पीठ घेऊन गोळा त्यावर ठेवा. हातांच्या बोटांनी किंवा तळ हातानं गोळा हळूहळू थापा. भाकरी थापताना ती समान जाडीची आणि गोल असेल याची काळजी घ्या. भाकरी जास्त जाड ठेवू नका. त्यामुळे नीट भाजली जाणार नाही.

भाकरी भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर भाकरी घाला. एका बाजूनं भाकरी थोडी भाजली गेल्यानंतर त्यावर पाण्याचा हात फिरवा. ज्यामुळे भाकरी मऊ राहते आणि कडक होत नाही. भाकरी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

तांदळाची भाकरी बिघडू नये म्हणून टिप्स

1) भाकरीसाठी पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा. जास्त गरम नसावे अन्यथा हात भाजेल. गरम पाण्यामुळे पीठ मऊ होते आणि भाकरीला तडे जात नाहीत. पीठ मळताना हळूहळू व्यवस्थित मळा. 

2) भाकरी थापताना हलक्या हातानं थापा. जास्त दाब दिल्यामुळे भाकरी फाटू शकते. भाकरीसाठी प्लास्टीकच्या कागदाचा वापर करत असाल तर उत्तम. त्यामुळे व्यवस्थित भाकरी थापता येईल.

3) भाकरी भाजताना तवा मध्यम गरम असावा. तवा जास्त गरम असेल तर भाकरी बाहेरून करपते आणि मधून कच्ची राहते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स