lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके

डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके

How to make Soft Rava Idli Recipe : नव्या पद्धतीची इन्स्टंट मऊ रवा इडली करण्याची सोपी कृती, करा नाश्ता झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 10:32 AM2024-05-02T10:32:11+5:302024-05-02T10:34:35+5:30

How to make Soft Rava Idli Recipe : नव्या पद्धतीची इन्स्टंट मऊ रवा इडली करण्याची सोपी कृती, करा नाश्ता झटपट

How to make Soft Rava Idli Recipe | डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके

डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके

नाश्त्याला बऱ्याच जणांना इडली खायला आवडते (Rava Idli). वाफवलेली इडली खाल्ल्याने पोट टम्म भरते. शिवाय इडली खाण्याचे अनेक फायदेही आहेत. इडली सांबार, इडली चटणी, किंवा चिल्ली इडली असे पदार्थ आपण खातो (Idli Recipe). पण दाक्षिणात्य पद्धतीने इडली करायला गेलं तर, खूप वेळ लागतो (Cooking Tips). उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घालण्यापासून ते पीठ दळणं, आणि पीठ आंबवणं ही प्रक्रिया खूप वेळखाऊ वाटते.

जर आपल्याला झटपट इडली खाण्याची इच्छा झाली असेल आणि डाळ - तांदूळ घालायला विसरले असाल तर, आपण रव्याची १० मिनिटात तयार होणारी इन्स्टंट इडली करू शकता. यासाठी आपल्याला पीठ आंबवण्यासाठी ७ ते ८ तास वाट पाहावी लागणार नाही. अगदी १० मिनिटात चविष्ट रवा इडली तयार होईल(How to make Soft Rava Idli Recipe).

मऊ लुसलुशीत रवा इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

दही

पाणी

दही

मीठ

गाजर

बेकिंग सोडा

कोथिंबीर

तूप

उडीद डाळ

विकतचा कशाला? घरीच अचूक प्रमाणात करा 'गरम मसाला'; चव अशी की विकतचे मसाले ठरतील फेल

हिंग

मोहरी

जिरं

काजू

हिरवी मिरची

आलं

कडीपत्ता

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप रवा घाला. नंतर त्यात एक कप पाणी, एक कप दही घालून मिक्स करा. नंतर त्यात २ चमचे मीठ, एक चमचा हळद, किसलेला गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

ना लाटणे-ना पीठ मळणे; कपभर चणा डाळीचे करा कुरकुरीत पापड; तेलात तळताच फुलतील दुप्पट

दुसरीकडे एका कढईत एक चमचा तेल घाला. नंतर त्यात एक चमचा तूप, एक चमचा उडीद डाळ, चिमुटभर हिंग, एक टेबलस्पून मोहरी, एक चमचा जिरं, काजूचे तुकडे, किसलेला आलं, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कडीपत्ता घालून मिक्स करा. तयार फोडणी बॅटरमध्ये ओतून चमच्याने ढवळत राहा.

आता बॅटरमध्ये छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. आता इडली पात्राला ब्रशने तेल लावा. स्टीमरमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवा. इडली पात्रामध्ये चमचाभर बॅटर ओता. नंतर इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवा, आणि त्याला झाकण लावा. ५ ते ६ मिनिटानंतर झाकण उघडून इडली पात्र बाहेर काढा. चमच्याने इडली अलगद काढा. अशा प्रकारे सुपर सॉफ्ट इडली खाण्यासाठी रेडी.

Web Title: How to make Soft Rava Idli Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.