Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी तेलकट, मस्त फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक! टम्म फुगेल पुरी-आतून मऊसूत होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 20:04 IST

How to Make Soft Puri : पुऱ्यांचं कणीक मळताना जर तुम्ही पिठात काही पदार्थ कालवले तर पुऱ्या सॉफ्ट आणि फुललेल्या होतील.

सणासुधीला तसंच नेहमी चपात्या खाऊन कंटाळा आला की बऱ्याच घरांमध्ये पुऱ्या केल्या जातात. पुऱ्या भाजी, श्रीखंड, बासुंदी कशासोबतही अगदी उत्तम लागतात (How To Make less Oily And Soft Puri At Home). मऊ फुगलेल्या पुऱ्या करणं काही सोपं काम नाही. परफेक्ट पुरी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. बरेच लोक पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करतात तर काहीजण दुधाचा वापर करतात. पुऱ्यांचं कणीक मळताना जर तुम्ही पिठात काही पदार्थ कालवले तर पुऱ्या सॉफ्ट आणि फुललेल्या होतील. (How to Make Soft Puri)

पीठ मळताना त्यात हा पदार्थ मिसळा

 पिठात दही, दूध थोडा रवा घातल्यानं पीठ मऊ होतं आणि पुरी सॉफ्ट तसंच फुगलेली होते.  ३ पदार्थ मिसळून पुरी केल्यास याचं टेक्चर मुलायम मऊ होतं आणि पुरी चवीला उत्तम लागते.

मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

 पीठ मळण्याची योग्य पद्धत कोणती?

सगळ्यात आधी एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. त्यात १ ते २ चमचे दही किंवा दूध मिसळा. नंतर यात १ चमचा रवा घाला. नंतर चवीनुसार मीठ घाला. हळूहळू पाणी घालून पीठ व्यवस्थित एकजीव करून मळून घ्या. जेव्हा पीठ पूर्णपणे मळून होईल तेव्हा अर्ध्या तासासाठी तसंच सोडून द्या.

पुरी लाटण्याची आणि तळण्याची पद्धत

पुरी लाटताना ती सर्व बाजूंनी सारखी असावी. जास्त पातळ लाटल्यास पुरी कडक होते आणि जास्त जाड राहिल्यास मध्ये कच्ची राहू शकते. पुरी लाटताना शक्यतो सुक्या पिठाचा वापर टाळावा. त्याऐवजी थोड्या तेलाचा हात लावून पुऱ्या लाटाव्यात. 

केसांना किती वेळ शॅम्पू लावून ठेवावा? जावेद हबीब सांगतात दाट-सुंदर केसांसाठी केस कसे धुवावेत

जर तेल कमी गरम असेल तर पुरी फुगत नाही आणि तेल पितात. तेल नीट गरम झाल्यावरच तेलाच पुरी सोडा. गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्या.  नंतर कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झालं की त्यात लाटलेली पुरी घाला आणि हलक्या हातानं दाबून घ्या. पुरी मध्यम आचेवर तळून घ्या.  यामुळे पुरी छान फुगण्यास मदत होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Secret trick for less oily, perfectly puffed, soft Puris revealed!

Web Summary : Make soft, fluffy puris easily! Add yogurt, semolina, or milk to the dough. Roll evenly, avoid dry flour, and fry in hot oil, pressing gently for perfect results.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स