Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कापसासारखा मऊसूत नीर डोसा ५ मिनिटांत करा; ५ टिप्स, हॉटेलसारखा जाळीदार बनेल डोसा

कापसासारखा मऊसूत नीर डोसा ५ मिनिटांत करा; ५ टिप्स, हॉटेलसारखा जाळीदार बनेल डोसा

How To Make Soft Neer Dosa : नीट डोसा परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:40 IST2026-01-19T13:35:19+5:302026-01-19T14:40:37+5:30

How To Make Soft Neer Dosa : नीट डोसा परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात.

How To Make Soft Neer Dosa : Neer Dosa Recipe 5 Tips To Make Neer Dosa | कापसासारखा मऊसूत नीर डोसा ५ मिनिटांत करा; ५ टिप्स, हॉटेलसारखा जाळीदार बनेल डोसा

कापसासारखा मऊसूत नीर डोसा ५ मिनिटांत करा; ५ टिप्स, हॉटेलसारखा जाळीदार बनेल डोसा

मऊ, लुसलुशीत जाळीदार नीर डोसा खायला सर्वांनाच आवडतो. हा डोसा  परफेक्ट मऊ आणि जाळीदार  करणं ही एक कला आहे. जरी त्याचे साहित्य साधे असले तरी योग्य पद्धत वापरल्यानंतरच डोसा हॉटेलसारखा परफेक्ट होतो. नीट डोसा परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात. नीर डोसा टोमॅटोच्या चटणीसोबत, काळ्या वटाण्याच्या उसळीसोबत, चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खूपच चवदार लागतो. (How To Make Soft Neer Dosa)

 तांदळाची निवड आणि भिजवणं

नीर डोश्यासाठी शक्यतो जुना कोलम किंवा जाड तांदूळ वापरावा. बासमती तांदूळ वापणं टाळा कारण त्यामुळे हवा तसा मऊपणा येत नाही. तांदूळ किमान पाच ते तास रात्रभर भिजत ठेवा. जेणेकरून ते व्यवस्थित वाटले जातात.

न लाटता, न पीठ मळता करा १ वाटी गव्हाच्या पिठाचा पोळा; ५ मिनिटांत नाश्ता-पोळा म्हणा किंवा धिरडं..

 वाटण्याची पद्धत

तांदूळ वाटताना अर्धी वाटी ताजं ओलं खोबरं नक्की घाला. खोबऱ्यामुळे डोश्याला छान पांढराशुभ्र रंग येतो आणि डोसा मऊ होतो. वाटताना पाणी कमीत कमी वापरा जेणेकरून पीठ एकदम गुळगुळीत होईल. पिठात कण राहिले तर डोसा फाटू शकतो.

पिठाचा पातळपणा
 
हे सर्वात महत्वाचे आहे. नीर म्हणजे पाणी. त्यामुळे पिठाची सुसंगता पाण्यासारखी पातळ असावी. पीठ जास्त असेल आणि घट्ट असेल तर डोसा कडक होतो. पीठ बोटावर घेतले असेल तर ते पारदर्शक दिसायला हवं.

तव्याचं तापमान आणि पसरवण्याची पद्धत

नीर डोसा करण्यासाठी शक्यतो  कास्ट आयर्न किंवा नॉन स्टिक तवा वापरा. तवा चांगला कडकडीत गरम असायला हवा. तव्यावर पाण्याचा हबका मारल्यावर आवाज यायला हवा. पीठ तव्याच्या कडेने मध्यभागाकडे ओतावे. डोसा पसरवण्यासाठी पळीचा वापर करू नका. फक्त तवा फिरवून पीठ पसरवून घ्या.

खिडकीत कबुतरांचा उच्छाद? काळ्या पिशवीचा १ उपाय, कबुतरं घरात येत नाहीत..

भाजणं आणि साठवणं

नीर डोसा फक्त एकाच बाजूनं भाजला जातो. झाकण ठेवून वाफेवर १ मिनिटभर शिजवा. डोसा काढताना तो तव्याला चिकटू नये म्हणून कडा सुटल्या की अलगट काढा. गरम असताना डोश्याची घडी घालू नका. कारण ते एकमेकांना चिकटू शकतात. थोडं थंड झाल्यावर त्याची त्रिकोणी घडी घाला.

Web Title : 5 मिनट में नरम नीर डोसा: होटल जैसा बनाने के लिए टिप्स

Web Summary : घर पर नरम, जालीदार नीर डोसा बनाना सीखें! पुराना चावल, नारियल और पतला घोल इस्तेमाल करें। गरम तवा, भाप में पकाएं, और मोड़ने से पहले ठंडा करें, सर्वोत्तम परिणामों के लिए।

Web Title : 5-Minute Soft Neer Dosa Recipe: Tips for Hotel-Style Perfection

Web Summary : Learn to make soft, lacy Neer Dosa at home! Use aged rice, coconut, and a thin batter. Hot pan, steam cook, and cool before folding for best results.