Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > रेस्टाँरंटमध्ये मिळतो तसा मऊ, मोकळा जीरा राईस घरीच करा; सोपी रेसिपी, परफेक्ट होईल राईस

रेस्टाँरंटमध्ये मिळतो तसा मऊ, मोकळा जीरा राईस घरीच करा; सोपी रेसिपी, परफेक्ट होईल राईस

How To Make Soft Jeera Rice At Home : हा पदार्थ डाळ तडका किंवा कोणत्याही मसालेदार ग्रेव्हीसोबत अप्रतिम लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 17:44 IST2026-03-30T17:34:15+5:302026-03-30T17:44:08+5:30

How To Make Soft Jeera Rice At Home : हा पदार्थ डाळ तडका किंवा कोणत्याही मसालेदार ग्रेव्हीसोबत अप्रतिम लागतो.

How To Make Soft Jeera Rice At Home : Easy Perfect Jeera Rice Recipe | रेस्टाँरंटमध्ये मिळतो तसा मऊ, मोकळा जीरा राईस घरीच करा; सोपी रेसिपी, परफेक्ट होईल राईस

रेस्टाँरंटमध्ये मिळतो तसा मऊ, मोकळा जीरा राईस घरीच करा; सोपी रेसिपी, परफेक्ट होईल राईस

भारतीय स्वंयपाकात जीरा राईस (Jeera Rice) हा एक अत्यंत लोकप्रिय आणि आवडीचा प्रकार आहे. बरेचजण घरात जीरा राईस करण्याचा प्रयत्न करता पण कोणता तांदूळ घ्यावा, भात मोकळा होण्यासाठी काय करावं असे प्रश्न अनेकांना पडतात ( Easy Perfect Jeera Rice Recipe). हॉटेलसारखा सुटसुटीत आणि सुवासिक जीरा राईस घरी बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी प्रामुख्याने लांब दाण्याचा बासमती तांदूळ वापरणे केवढेही उत्तम. हा पदार्थ डाळ तडका किंवा कोणत्याही मसालेदार ग्रेव्हीसोबत अप्रतिम लागतो. (How To Make Soft Jeera Rice At Home)

जीरा राईस  करण्यासाठी पूर्व तयारी

सुरुवातीला, दोन वाट्या बासमती तांदूळ घेऊन तो स्वच्छ धुवावा आणि साधारण २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. तांदूळ भिजवल्यामुळे भाताचा दाणा लांब होतो आणि तो व्यवस्थित शिजतो. फोडणीसाठी आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप, एक मोठा चमचा जीरं, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, लवंग आणि चवीनुसार मीठ लागेल. तुपामुळे जीरा राईसला एक वेगळाच रिचनेस आणि सुगंध प्राप्त होतो.

जीरा  राईसची सोपी कृती

एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये तूप गरम करा. तूप तापल्यावर त्यात तमालपत्र आणि खडा मसाला घालावा. त्यानंतर त्यात भरपूर जीरं घालावं. जीरं चांगलं तडतडले की त्याचा सुगंध तुपात छान उतरतो. आता भिजवलेले तांदूळ पाणी काढून त्यात घालावे आणि हलक्या हाताने दोन मिनिटे परतून घ्या. तांदूळ परतल्याने जीरा राईस शिजल्यावर चिकट होत नाही. आता यात तांदळाच्या दुप्पट म्हणजेच चार वाट्या गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे.

शिजवण्याची पद्धत

पाण्याला उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मंद करावी आणि झाकण ठेवून भात शिजू द्यावा. जर तुम्ही कुकर वापरत असाल, तर फक्त एक शिटी घ्यावी. भात शिजल्यानंतर लगेच चमचा न लावता ५-१० मिनिटे वाफेवर तसाच ठेवावा जेणेकरून जीरा राईस छान मोकळा होतो. शेवटी, वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला. अशा प्रकारे गरमागरम आणि सुवासिक जीरा राईस खाण्यासाठी तयार आहे.

Web Title : आसान जीरा राइस रेसिपी: घर पर रेस्टोरेंट जैसा, हर बार परफेक्ट

Web Summary : घर पर स्वादिष्ट जीरा राइस बनाएं! बासमती चावल का उपयोग करें, इसे भिगोएँ और घी, जीरा और मसालों के साथ भूनें। गरम पानी डालें, नरम होने तक पकाएं। धनिया से सजाएं। रेस्टोरेंट जैसा स्वाद लें!

Web Title : Easy Jeera Rice Recipe: Restaurant-Style at Home, Perfect Every Time

Web Summary : Make flavorful Jeera Rice at home! Use Basmati rice, soak it, and sauté with ghee, cumin, and spices. Add hot water, cook until fluffy. Garnish with coriander. Enjoy restaurant-quality taste!