आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला इडली - सांबार, चटणीचा बेत हमखास ठरलेला असतोच. बऱ्याच गृहिणी मोठ्या हौसेने नाश्त्याला इडली करतात, परंतु बऱ्याचजणींची अशी तक्रार असते की इडल्या फुगत नाहीत. इडली जर मऊसूत, लुसलुशीत, स्पॉंज सारखी सॉफ्ट झाली तरच खाण्यात खरीखुरी (How to Make Soft Idli Batter Recipe At Home) मजा आहे. खरंतरं, उडप्याकडे किंवा हॉटेलमध्ये विकत मिळणारी इडली इतकी लुसलुशीत आणि मऊ असते की, आपल्याला प्रश्न पडतो की आपण घरी केल्यावर इडली अशी का होत नाही. याचं खरं सिक्रेट आहे इडलीच्या (perfect idli batter recipe) बॅटरचं परफेक्ट प्रमाण. घरी इडली करताना ती कडक होते किंवा व्यवस्थित फुगत नाही, असं होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे डाळ आणि तांदळाच्या प्रमाणाचे गणित फसणे( Idli batter ratio rice and urad dal).
इडली मऊ आणि जाळीदार होण्यासाठी, योग्य प्रमाणात डाळ आणि तांदूळ वापरणे खूप महत्त्वाचे असते. यासोबतच, बॅटर योग्य पद्धतीने आंबवणे देखील तितकेच गरजेचे असते. इडल्या तयार करण्यासाठी डाळ - तांदूळ नेमके किती घ्यावेत याचे अचूक प्रमाण बऱ्याचजणींना माहित नसते. इडलीसाठी डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण, बॅटर कसं तयार करावं आणि त्या संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे इडली हॉटेलसारखीच मऊ, लुसलुशीत व सॉफ्ट होईल. उडप्याकडे किंवा हॉटेलमध्ये विकत मिळते अगदी तशीच सॉफ्ट, स्पॉंजी आणि मऊ - लुसलुशीत इडली तयार ( how to make idli batter) करण्यासाठी डाळ - तांदुळाचं प्रमाण नेमकं किती घ्याव ते पाहूयात.
परफेक्ट मऊ - लुसलुशीत इडली तयार करण्यासाठीचे योग्य प्रमाण...
१. पांढरी उडीद डाळ - २ कप (स्वच्छ धुवून घेतलेली)
२. तांदूळ - ४ कप
३. पोहे - १/२ कप (पातळ पोहे)
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. पाणी - गरजेनुसार
६. मीठ - चवीनुसार
७. इडली रवा - १ कप
इडली बॅटर कसे तयार करावे ?
१. सर्वात आधी उडीद डाळ आणि मेथीचे दाणे स्वच्छ धुऊन वेगळ्या भांड्यात ५ ते ६ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
२. त्याचप्रमाणे, तांदूळ आणि पोहे सुद्धा दुसऱ्या भांड्यात ५ ते ६ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. यासोबतच एका वेगळ्या भांड्यात इडली रवा देखील पाण्यात भिजत ठेवा.
३. भिजवलेले डाळ व तांदूळ व इतर मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करा.
४. ही पेस्ट वाटताना थोडे थोडे थंड पाणी घाला, जेणेकरून बॅटर हलके आणि आंबवल्यावर अधिक जास्त फुगेल. हे मिश्रण थोडे जाडसर वाटा, जेणेकरून बॅटरचा पोत (texture) चांगले होईल.
५. एका मोठ्या भांड्यात डाळीची पेस्ट आणि तांदळाची पेस्ट एकत्र करा आणि चांगले मिसळून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. ते इडली पात्रात सहज ओतता येईल अशा स्वरूपात असावे.
६. आता हे बॅटर झाकून ८ ते १० तासांसाठी उबदार ठिकाणी ठेवा. तयार बॅटर ८ ते १० तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवून द्यावे. जेव्हा बॅटर दुप्पट होईल आणि त्याला हलकीशी आंबट चव येऊ लागेल, तेव्हा समजा की बॅटर व्यवस्थित आंबले गेले आहे
७. बॅटर आंबल्यानंतर, त्यात मीठ घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. आता हे बॅटर इडली बनवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
परफेक्ट इडली बॅटरसाठी खास टिप्स...
१. बॅटर आंबवण्यासाठी ठेवताना त्यात मीठ घालू नका.
२. बॅटर नेहमी स्टील किंवा काचेच्या भांड्यातच ठेवा.
३. थंडीच्या दिवसात बॅटर किचनमधील उबदार जागेत किंवा ओव्हनमध्ये लाईट चालू करून ठेवू शकता.
४. डाळ वाटताना पाणी थंड असावे, यामुळे बॅटर अधिक हलके होते.
५. बॅटर अजिबात जास्त पातळ करू नका, नाहीतर इडल्या कडक होतील.
इडली बॅटर फक्त इडलीसाठीच नाही, तर डोसा, उत्तप्पा आणि आप्पे तयार करण्यासाठी देखील वापरता येतो. म्हणजेच, एकदा बॅटर तयार केले की, तुम्ही त्यापासून ३ ते ४ प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ सहज बनवू शकता. हे पदार्थ आरोग्यदायी असल्यामुळे, ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. यामध्ये लोह, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.