घरी केलेल्या इडल्या (Idli) कडक होतात तर कधी आंबटच लागत नाहीत अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. इडल्या मऊसूत, परफेक्ट होण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता (South Indian Style Idli Recipe). साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळतात तशा मोठ्या, परफेक्ट मऊसूत इडल्या घरी करणं एकदम सोपं आहे. अशा इडल्या करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. इडली करण्याच्या लहान लहान ट्रिक्स तुमचं काम सोपं बनवतील. या मऊसूत इडल्या नारळाची चटणी किंवा सांबारबरोबर उत्तम लागतील. (How To Make Soft Fluffy Idli)
१) तांदूळ कमी डाळ जास्त
डाळ-तांदळाची इडली करताना ३ भाग तांदूळ तर १ भाग डाळ घ्या. उडीद डाळीचं प्रमाण वाढवल्यास पीठ अधिक चिकट, हलके होते ज्यामुळे इडली मऊ बनते. शक्य असल्यास पॉलिश न केलली उडीद डाळ वापरा. पॉलिश केलेल्या डाळीचे नैसर्गिक तेलकटपणा कमी झालेला असतो. डाळ कमीत कमी ६ ते ८ तास भिजवा ती दळताना जास्त पाणी घालू नका.
२) वाटण्याची योग्य पद्धत
आधी उडीद डाळ आणि बर्फाचे थंड पाणी वापरून खूप गुळगुळीत दळून घ्या. नंतर तांदळाचे कण दळताना रव्यासारखे राहू द्या. पुर्ण बारीक पेस्ट करू नका. हे रवाळ कण इडलीला चांगली जाळी देतात. तांदूळ भिजवताना मूठभर जाड पोहे किंवा साबुदाणा भिजवा आणि तांदळासोबत दळा. हे दोन्ही घटक पीठ आंबवण्याच्या क्रियेला गती देतात आणि इडलीला चांगला मऊपणा येतो.
३) आंबवण्याची प्रक्रिया
इडल्या मऊ होण्यात आंबवण्याची प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. जर वातावरण थंड असेल तर पीठ असलेले भांडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये फक्त दिवा लावून ठेवा. दिव्याची उष्णता आंबवण्यासाठी योग्य तापमान टिकवून ठेवते. पीठ दळल्यानंतर एकत्र मिसळण्यासाठी हात वापरा, चमचा न वापरता हाताच्या उष्णतेमुळे आंबवण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते.
४) साच्यात असं पीठ भरा
जास्त आंबवलेले पीठ वापरताना इडलीच्या साच्यात भरण्यापूर्वी ते जास्त ढवळू नका. पिठातील हवा तशीच ठेवून इडली साच्यात भरा.इडली १० ते १२ मिनिटं मध्यम ते जास्त आचेवर वाफवा जास्त वेळ वाफवल्यास इडली कडक होते.
५) इडली साच्यातून अशी काढा
इडली वाफवून झाल्यावर लगेच साचे बाहेर काढा. साचे बाहेर काढल्यावर त्यावर थंड पाण्याचा हबका मारा किंवा ३० सेकंद थंड पाण्याच्या भांड्यावर ठेवा. यामुळे इडल्या साच्याला न चिकटता सहज आणि व्यवस्थित निघतील. फ्रिजमध्ये ठेवल्या पिठापासून दुसऱ्या दिवशी इडल्या करताना पीठ खूपच थंड झालेले असते. अशावेळी पिठात एक छोटा चमचा गरम पाणी आणि एक चमचा तेल घालून हलक्या हातानं मिसळा. गरम पाण्यामुळे आंबवलेल्या पिठाचे कण पुन्हा सक्रिय होतात आणि तेल मऊपणा टिकवून ठेवते.
