चपाती सर्वांच्याच घरी खाल्ली जाते. भारतात दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणाला चपाती खातात तर काहीजण नाश्त्यालाही चहा चपाती खातात (Cooking Hacks). पण चपाती केल्यानंतर काही वेळातच कडक होते मऊ राहत नाही अशी अनेकांची तक्रार असते. गोल, मऊ चपात्या करणं सर्वांनाच जमतं असं नाही. काहीजणांनी केलेल्या चपात्या लगेच मऊ पडतात. मऊ, गरम चपाती करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Soft Gol Chapati)
मऊ चपाती करण्याची पीठ मळण्याची योग्य पद्धत कोणती?
चपाती करण्यासाठी पीठ मऊ असायला हवं. मऊ चपाती करण्यासाठी पीठ मळताना मीठ आणि तेल त्यात मिसळा. सगळ्यात आधी परातीत पीठ काढून घ्या. नंतर त्यात १ चिमूटभर मीठ, थोडं तेल घाला. नंतर हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळल्यानंतर सुती कापडानं झाकून ठेवा. यामुळे पीठ व्यवस्थित मुरेल. तेल आणि मीठ घातलेली चपाती पचायला चांगली असते. अर्ध्या तासानंतर जेव्हा चपाती कराल तेव्हा चपात्या मऊ होतील.
गोल चपाती करण्यासाठी चपातीच्या कणकेचे गोळे करून घ्या. त्याला पीठ लावून चपटे करून घ्या. नंतर पोळपाटावर ठेवा मग लाटण्याच्या मदतीनं हलक्या हातानं लाटा. तवा गॅसवर ठेवा गरम होऊ द्या. नंतर तव्यावर चपाती घाला. एका बाजूनं शेकल्यानंतर चपाती पलटून घ्या मग दोन्ही बाजूंनी शेका. नंतर सुती कापडाच्या मदतीनं तव्यावर दाबून शिजवून घ्या किंवा तव्यावरून काढून थेट आचेवर शिजवा.
लक्ष्मीपूजनाला काढा या सोप्या, सुबक रांगोळ्या; ५ मिनिटांत काढून होईल, वाढेल दाराची शोभा
चपाती फुगण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी कणिक मऊ आणि लवचिक मळणे सर्वात महत्त्वाचे आहे. कणिक घट्ट मळल्यास चपाती फुगत नाही आणि वातड होते. कणिक मळण्यासाठी कोमट पाणी वापरा. तसेच, पीठ मळताना त्यात थोडे तेल किंवा तूप घाला.
बहिणीसाठी ५०० रुपयांच्या आत घ्या कॉटन कुर्ता सेट्स; ८ स्वस्तात मस्त ड्रेसेस, पाहा
कणिक मळून झाल्यावर लगेच चपात्या न करता, कणिक किमान १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा. यामुळे कणिक चांगली सेट होते आणि चपाती फुगायला मदत होते.चपात्या लाटण्यापूर्वी कणकेचा गोळा पुन्हा एकदा चांगला मळून घ्या, जेणेकरून तो एकदम गुळगुळीत आणि एकसमान होईल.