Lokmat Sakhi >Food > भरपूर पुडं असणारी घडीची मऊसूत पोळी करायची आहे, ३ गाेष्टी फक्त करा! परफेक्ट पोळी जमणारच..

भरपूर पुडं असणारी घडीची मऊसूत पोळी करायची आहे, ३ गाेष्टी फक्त करा! परफेक्ट पोळी जमणारच..

Cooking Tips For Making Soft And Fluffy Roti: पोळ्या नेहमीच कडक, वातड होत असतील तर त्या छान मऊ होण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं ते पाहा...(how to make soft chapati?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 18:10 IST2025-07-30T17:06:59+5:302025-07-30T18:10:22+5:30

Cooking Tips For Making Soft And Fluffy Roti: पोळ्या नेहमीच कडक, वातड होत असतील तर त्या छान मऊ होण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं ते पाहा...(how to make soft chapati?)

how to make soft chapati, simple tips and tricks for making perfect roti? cooking tips for making soft and fluffy roti  | भरपूर पुडं असणारी घडीची मऊसूत पोळी करायची आहे, ३ गाेष्टी फक्त करा! परफेक्ट पोळी जमणारच..

भरपूर पुडं असणारी घडीची मऊसूत पोळी करायची आहे, ३ गाेष्टी फक्त करा! परफेक्ट पोळी जमणारच..

Highlightsतुमच्या आजी, आई, काकू करायच्या तशी अगदी परफेक्ट पोळी तुम्हालाही यावी असं वाटत असेल तर या काही गोष्टी ट्राय करून पाहा..

पोळ्या किंवा चपात्या हा आपल्या जेवणाचा अगदी महत्त्वाचा भाग. एकवेळी भाजी, आमटी, वरण या पदार्थांमध्ये थोडं कमी- जास्त झालं तर ते धकून जातं. पण पोळ्या मात्र उत्तमच हव्या. कारण पोळी जर कडक, वातड, अर्धवट भाजली गेलेली किंवा जास्त जळकट अशा कोणत्याही पद्धतीची झाली तरी जेवण जात नाही. पोळी अशी हवी जी अगदी मऊसूत असेल. शिवाय जेव्हा आपण तिचा एखादा तुकडा तोडू तेव्हा तिच्यातले ३ ते ४ पदर अगदी वेगळे दिसायला हवे.. ती पोळी किंवा चपाती आपल्याकडे परफेक्ट समजली जाते (Cooking Tips For Making Soft And Fluffy Roti). आता अशी तुमच्या आजी, आई, काकू करायच्या तशी अगदी परफेक्ट पोळी तुम्हालाही यावी असं वाटत असेल तर या काही गोष्टी ट्राय करून पाहा..(how to make soft chapati?)

पोळ्या उत्तम जमण्यासाठी काय करावं?

 

१. कणिक मळताना..

कणिक मळणं ही पोळ्या करण्याच्या रेसिपीमधली सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे. कणिक मळताना ती खूप घट्ट किंवा खूप सैलसर भिजवू नका.

आईबाबांनी नकळत केलेल्या २ गोष्टी मुलांचा आत्मविश्वास कमी करतात, मुलं होतात कुढी-अबोल-बुजरी

घट्ट कणिक भिजवली तर तिच्या पोळ्याही वातड, कडक होतात. सैलसर कणकेच्या पोळ्या लाटणंही त्रासदायक होतं. पोळीचा आकार बिघडतो. कुठे पातळ तर कुठे जाड असते. त्यामुळे कणिक व्यवस्थित भिजवा.

 

२. कणिक मळल्यानंतर..

कणिक मळून झाल्यानंतर तिला १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. त्याआधी पोळ्या लाटायला घेतल्या तर त्या व्यवस्थित लाटल्या जात नाहीत.

एक केसर चाय की प्याली हो! रिमझिम पावसात प्या केशर चहा, मन आनंदी करणारी स्पेशल चहा रेसिपी

साधारण २० मिनिटांनंतर हाताला किंवा कणकेला थोडे तेल लावून घ्या आणि ५ ते ७ मिनिटे कणिक पुन्हा मळून घ्या. जेवढी जास्त कणिक मळाल तेवढ्या तुमच्या पोळ्या अधिक मऊ होतील.

 

३. पोळी लाटताना..

कणकेचा गोळा पुरीएवढ्या आकाराचा झाल्यानंतर त्याला व्यवस्थित तेल लावून घ्या आणि नंतर ती अगदी दुमडून तिचा त्रिकोण करून घ्या.

डार्क सर्कल्स वाढल्याने डोळे खोल गेल्यासारखे दिसतात? करा बटाट्याचा खास उपाय- काळसरपणा गायब

आता या त्रिकोणाला दोन्ही बाजुंनी कणिक लावा आणि हळूवार हाताने तो लाटा. काही जणी खूप जोर लावून पोळी लाटतात. असं केल्याने पोळीला अजिबात पदर सुटत नाहीत. शिवाय पोळी सगळ्या बाजुने सारखी लाटावी. यामुळे ती सगळीकडून सारखी होते. कुठे जाड तर कुठे पातळ राहात नाही. 
 

Web Title: how to make soft chapati, simple tips and tricks for making perfect roti? cooking tips for making soft and fluffy roti 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.