Join us

तव्यावरून काढताच चपाती वातड होते? पीठ मळण्याची ही पद्धत वापरा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:16 IST

Soft Chapati Making Tips : चपातीचे पीठ मळण्याच्या काही टिप्स तुमचं काम सोपं करतील.

पीठ मळण्याची टेक्निक ही अशी आहे जी खूप कमी लोकांना माहित असते. कारण याच कारणामुळे चपात्या मऊ, मुलायम आणि फुललेल्या बनतात.(Tips To Make Soft Chapati) चपात्यांचं पीठ कसं मळायचं, पिठाचं टेक्स्टचर कसं असावं असे प्रश्न अनेकांना पडतात. चपातीचे पीठ मळण्याच्या काही टिप्स तुमचं काम सोपं करतील. ज्या फॉलो करून तुम्ही सॉफ्ट, फुललेल्या चपात्या बनवू शकता. (How To Make Soft Chapati To Knead Dough Flour)

चपातीचं पीठ मळताना त्यात दूध घाला

दूध एक पदार्थ आहे. ज्याचा वापर करून तुम्ही सॉफ्ट आणि फ्लफी चपात्या बनवू शकता. जर तुम्हाला सॉफ्ट, मऊ चपात्या हव्या असतील तर तुम्ही चपातीचं पीठ मिळताना त्यात दूधाचा वापर करू शकता. दुध थोड कोमट करून हळूहळू चपातीच्या पीठात घाला. पीठ व्यवस्थित मळून घ्या. चपाती, पराठी पूर्णपणे सॉफ्ट बनवायची असेल तर तुम्ही कोमट दूधाचा वापर करू शकता.

पीठ मळताना मीठ घाला

चपातीचं पीठ मळताना त्यात चुटकीभर मीठ घाला आणि पाण्याने पीठ मळून घ्या. मीठाने चपातीची चव अधिकच वाढते.  चपातीचे पीठ जास्त  घट्ट किंवा जास्त सैल असू नये. चपातीचं पीठ मळून कमीत कमी १० मिनिटांसाठी झाकून ठेवा. 

चपातीचे पीठ मळण्याच्या टिप्स

चपातीचे पीठ मळायला फक्त काही मिनिटं लागतात. हातांना आणि भांड्याला पिठ चिकटून नये यासाठी पीठ अर्थवट मळल्यानंतर त्यात थोडं पीठ घाला. काही लोक चपातीचं पीठ मळल्यानंतर लगेच चपाती करतात. पण पीठ मळल्यानंतर कमीत कमी १५ मिनिटं झाकून ठेवा.  त्यानंतर चपाती लाटून घ्या. यामुळे चपात्या मऊ, फुललेल्या बनतील. चपाती कधीच नॉनस्टिकच्या तव्यावर शिजवू नका. चपातीसाठी नेहमी लोखंडाच्या तव्याचा वापर करा.

चपाती करताना जास्त दाबू नका यामुळे चपाती फाटू शकते. म्हणूनच पातळ आणि समान चपाती लाटण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे चपाती चांगली फुगते. जर तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तर तुम्ही चपाती करताना त्यावर तूप किंवा बटर लावू शकता. ज्यामुळे चपात्या जास्तवेळ सॉफ्ट राहतात आणि कडक होत नाहीत. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स