भारतात प्रत्येकाच्याच घरी चपात्या केल्या जातात. चपाती हा हलका फुलका पदार्थ नसून आपल्या रोजच्या आहाराचा आणि संस्कृतीचा आधार आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत चपाती प्रत्येकाच्याच जेवणात असते. अनेकांना चपाती मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगलेली बनवण्यात अडचणी येतात (How To Make Soft Chapati At Home).
काहीवेळा चपात्या थंड झाल्यावर लगेच कडक होतात. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळाणाऱ्या मऊसूत चपात्यांचे रहस्य केवळ गव्हाचे पीठ नाही तर मळणाच्या, लाटण्याच्या, भाजण्याच्या अजूक तंत्रांचाही यात समावेश आहे. (How To Make Soft And Fluffy Chapati Soft Chapati Secret)
पीठ मळण्याची टेक्निक
पीठ मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्यामुळे गव्हाच्या पिठाची ग्लुटेन अधिक सक्रिय होते. ज्यामुळे पीठ लवकर लवचीक बनते आणि चपाती लाटताना तुटत नाही. पीठ मळताना पिठात चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल किंवा तूप घाला. तेलामुळे चपात्यांना मऊपणा मिळतो आणि त्या कडकही होत नाहीत.
पीठ मिळताना पिठात चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल किंवा तूप घाला. तेलामुळे चपात्यांना मऊपणा मिळतो आणि त्या कडक होत नाहीत. पिठाचा गोळा जास्त घट्ट न मळता, मऊसर मळा. हा गोळा खूप दाबून आणि हाताच्या तव्यानं मळून घ्या.
साधारणपणे ५ ते ७ मिनिटं सतत मळल्यास तो गुळगुळीत आणि एकजीव होईल. पीठ मळल्यानंतरचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विश्रांती. पिठाच्या गोळ्यावर थोडं तेल लावून एका हवाबंद डब्ब्यात झाकून किमान ३० मिनिटं विश्रांतीसाठी ठेवा. या वेळेत ग्लुटेन सेट होते. ज्यामुळे चपाती लाटायला सोपी जाते आणि जास्त मऊ होते.
लाटण्याचे आणि भाजण्याचे अचूक तंत्र
चपाती लाटताना तिची जाडी समान ठेवा. ती जास्त जाड किंवा खूप पातळ नसावी. समान जाडीमुळे ती भाजताना सगळीकडून एकसारखी फुगते. चपाती भाजण्यासाठी तवा चांगला गरम असणं आवश्यक आहे. तवा व्यवस्थित तापलेला नसेल तर चपातीला कडकपणा येतो आणि फुगत नाही. गरम तव्यावर चपाती शेका एका बाजूला पांढरे डाग दिसले की लगेच ती पलटून घ्या.
दुसऱ्या बाजूला थोडी भाजल्यावर ती चिमट्यानं उलचून थेट गॅसच्या मध्यम आचेवरील ज्वालांवर शेका. योग्यरित्या शेकल्यास चपाती लगेच टम्म फुगते. भाजलेल्या चपात्या लगेच एखाद्या कॉटनच्या स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवा नंतर त्या हवाबंद कॅसरोलमध्ये ठेवा. यामुळे त्यांची उष्णता आणि ओलावा टिकून राहतो आणि जास्तवेळ मऊसूत राहतात.
