कधी कधी मसालेदार काहीतरी खावंसं वाटतं. खासकरून सुट्टीच्या दिवशी तर जेवणात तोच तो साधा बेत मुळीच नको वाटतो.. अशावेळी हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत खाण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा तो बेत तुमच्या घरीच करून पाहा. शेवग्याची अगदी खमंग भाजी घरी करून सगळ्यांना खाऊ घाला. चव एवढी छान होईल की घरातले सगळेच त्यावर ताव मारतील. या रेसिपीने एकदा तुमच्या हातची शेवग्याची भाजी चाखल्यानंतर शेवगा मसाला बाहेर जाऊन खाण्याची कोणाला गरजच वाटणार नाही (how to make shevga masala at home?). बघा अगदी ढाबा स्टाईल शेवग्याची झणझणीत भाजी करण्याची रेसिपी..(easy recipe of shevga handi and shevga masala)
शेवग्याची भाजी करण्याची रेसिपी
साहित्य
शेवग्याच्या ३ ते ४ शेंगा
हरबरा डाळ आणि तांदूळ मिळून १ चमचा
बडिशेप, मेथ्या, जिरे, मिरे, धने, जायपत्री, मोठी वेलची, लवंग, तीळ असं सगळं मिळून दोन टेबलस्पून
१ टेबलस्पून खोबऱ्याचे तुकडे
माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल थंडगार
२ मध्यम आकाराचे कांदे
१ मोठ्या आकाराच टोमॅटो
१ चमचा आलं- लसूण पेस्ट
चवीनुसार लाल तिखट, काळा मसाला आणि मीठ
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
कृती
सगळ्यात आधी डाळ, तांदूळ, खोबरे एकेक करून कढईत भाजून घ्या. त्यानंतर मसाल्याचे सगळे पदार्थ भाजून घ्या. हे सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या. हा मसाला खूप बारीक करावा. अजिबात जाडाभरडा ठेवू नये.
त्यानंतर शेवग्याच्या शेंगा धुवून त्याचे तुकडे करा आणि एका पातेल्यात मीठ आणि पाणी घालून त्यात शेंगा उकडून घ्या.
लठ्ठपणा टाळण्यासाठी सेलिब्रिटी काय करतात? त्यांच्याकडूनच घ्या खास टिप्स- राहाल नेहमीसाठी फिट
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्या.
त्यानंतर चिमूटभर हळद घाला आणि कांदा, टोमॅटो, लसूण- आलं यांची पेस्ट करून कढईमध्ये घालून परतून घ्या.
कांदा- टोमॅटोच्या प्युरीमधलं पाणी कमी झालं आणि मिश्रणाला तेल सुटू लागलं की मग त्या मिश्रणात वरील पद्धतीने तयार केलेला गरम मसाला, लाल तिखट घाला
मसाला आणि कांदा- टोमॅटोचं परतून घेतलेले मिश्रण छान एकजीव झालं की त्यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा त्याच्यातल्या पाण्यासकट टाका. शेंगा शिजवताना मीठ घातलेलं होतं. त्यामुळे तो अंदाज घेऊनच वरून पुन्हा मीठ घाला.
काय सांगता- आपण रोज खात असलेल्या 'या' भाज्या भारतातल्या नाहीच!!
भाजीला छान उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. १० मिनिटे कढईवर झाकण ठेवून भाजीतले मसाले छान सेट होऊ द्या आणि त्यानंतर गरमागरम भाजी सर्व करा. बघा तुम्ही केलेल्या या भाजीला अगदी ढाब्यासारखी झणझणीत चव येईल..