आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. तसे तर घरात नेहमीच एखादी अशी व्यक्ती असते जी नेहमीच कशाचा ना कशाचा उपवास करत असते. पण आषाढी एकादशीच्या उपवासाची मजाच वेगळी. कारण या दिवशी बहुतांश घरांमधले सगळेच लोक उपवास करतात. अगदी बच्चे कंपनीही आनंदाने त्यात सहभागी होत असते. त्यामुळे उपवासानिमित्त वेगवेगळ्या पदार्थांची चंगळ असते. तसेही उपवासाचे पदार्थ सगळ्यांना आवडतातच.. त्यामुळे अगदी गोडधोड पदार्थांपासून ते खमंग पदार्थांपर्यंत फराळाचे कित्येक पदार्थ पानात असतात. त्यात एक पदार्थ आवर्जून असतो तो म्हणजे शेंगदाणा लाडू (peanut laddu recipe for ashadhi ekadashi fast). पण काही जणींना हे लाडू अजिबातच जमत नाहीत. कधी गूळ खूप जास्त होतो तर कधी कमी झाल्यामुळे लाडवामध्ये काही गोडवाच नसतो. शिवाय काही जणींनी केलेले लाडू अगदीच भुसभुशीत होतो (how to make shengdana laddu?). त्यामुळे तो नीट खाताही येत नाही. असं काही तुमच्याही शेंगदाणा लाडूच्या बाबतीत होत असेल तर ही एक सोपी रेसिपी पाहून घ्या..(shengdana ladu recipe in just 5 minutes)
उपवासाचे शेंगदाणा लाडू करण्याची रेसिपी
साहित्य
२ वाट्या शेंगदाणे
पाऊण ते १ वाटी गूळ
२ चमचे साजूक तूप
किचनमधले नॅपकिन पिवळट, चिकट झाले? १ उपाय- तेलाचा वासही जाऊन नव्यासारखे स्वच्छ होतील
१ टीस्पून वेलची पावडर (वेलची पावडर नाही घातली तरी चालते.)
कृती
सगळ्यात आधी शेंगदाणे मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. त्यानंतर ते थंड होऊ द्या आणि त्यांची टरफलं काढून टाका. जर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील तर हे लाडू करायला ५ मिनिटेही लागत नाहीत.
त्यानंतर टरफलं काढून घेतलेले भाजके शेंगदाणे, गूळ आणि वेलची पावडर मिक्सरमध्ये घाला आणि बारीक करून घ्या. हे मिश्रण अगदी बारीकही करू नये आणि खूप जाडसरही ठेवू नये. कारण त्यावर लाडवाची चव खूप अवलंबून असते.
लाकडी फर्निचरवर स्क्रॅचेस दिसू लागले? २ उपाय करून जुनं फर्निचर नव्यासारखं चमकवून टाका
बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. त्यावर थोडं कोमट केलेलं पातळ तूप घाला. सगळं मिश्रण हाताने हलवून एकजीव करून घ्या आणि आता त्याचे लाडू वळा. जर मिश्रण खूप कोरडं वाटलं तर त्यात तुम्ही आणखी तूप घालू शकता.