Join us

लोणावळा चिक्कीपेक्षा भारी शेंगदाणा चिक्की करा घरी फक्त १० मिनिटांत, उपवासासाठी खास पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 18:08 IST

How To Make Shengdana Chikki At Home: विकत मिळते तशी अगदी चवदार लागणारी शेंगदाण्याची पौष्टिक चिक्की करण्याची एकदम सोपी रेसिपी...(simple and easy recipe of making peanut chikki in just 10 minutes)

ठळक मुद्देचिक्की करायला अतिशय सोपी आहे आणि खूप कमी वेळात ती करता येते.

श्रावण सुरू झाल्यामुळे सध्या उपवासाचे दिवस आहेत. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार असे श्रावणातले उपवास अनेक जण करतात. बऱ्याच घरातल्या अगदी लहान मुलांनाही श्रावणी सोमवारचा उपवास असतो. उपवासाच्या दिवशी पटकन तोंडात काहीतरी टाकायला हलकेफुलके पदार्थ असले की उपवासाचा त्रास होत नाही. एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच खास उपवासासाठी शेंगदाण्याची पौष्टिक चिक्की घरात करून ठेवाच (how to make shengdana chikki at home?).. ही चिक्की करायला अतिशय सोपी आहे आणि खूप कमी वेळात ती करता येते.(simple and easy recipe of making peanut chikki in just 10 minutes)

शेंगदाणा चिक्की करण्याची सोपी रेसिपी

 

साहित्य

१ वाटी शेंगदाणे

१ चमचा तूप

अर्धी वाटी गूळ 

ऐन तारुण्यात केस पांढरं होण्याचं ‘हे’ गंभीर कारण, डॉक्टर सांगतात तातडीने ४ उपाय करा

कृती 

सगळ्यात आधी शेंगदाणे मंद आचेवर चांगले खमंग भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर शेंगदाण्यांची टरफलं काढून घ्या आणि ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून त्याचा थोडा जाडाभरडा कूट करून घ्या. 

यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप घाला. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेला गूळ घाला. गुळाचे खडे घालू नका.

 

गुळाचा पाक तयार झाला की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हळूहळू घाला. कूट घातल्यानंतर कढईतलं मिश्रण थोडं सेमी सॉलिड प्रकारातलं हवं. अगदी घट्ट मिश्रण होणार नाही याची काळजी घ्या.

यानंतर अगदी एखादा मिनिट कढईतले सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या आणि त्यानंतर गॅस बंद करा.

किचन ट्रॉली स्वच्छ करण्याचा सोपा उपाय, साबणही न लावता फक्त ५ मिनिटांत ट्रॉली-रॅक चकाचक

आता एक स्टीलचे पसरट ताट घ्या. त्या ताटाला थोडे तूप लावा आणि त्यावर कढईतले चिक्कीचे गरम मिश्रण टाका. उलथणे किंवा वाटीने दाब देऊन ते एकसमान पसरवून घ्या. ते मिश्रण गरम असतानाच ते पसरवून घेणे आणि त्याच्या वड्या पाडणे गरजेचे असते. त्यामुळे ही दोन्ही कामं पटापट करा आणि त्यानंतर ते थंड होऊ द्या. मस्त चवदार आणि सुपरहेल्दी शेंगदाणा चिक्की तयार. 

 

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.श्रावण स्पेशलनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४