Join us

ढाबास्टाईल शेव टोमॅटोची भाजी फक्त घरीच करा १० मिनिटात; घ्या झणझणीत, चटकदार रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:22 IST

How to Make Sev Tamatar ki Sabji : गरमागरम चपात्या, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही शेवची भाजी खाऊ शकता.

जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो. फरसाण किंवा शेव आपल्या सर्वांच्याच घरी असतेच. (Cooking Hacks) शेवची भाजी हा पारंपारीक पदार्थ खायला चविष्ट, झणझणीत असतो. अनेक ग्रामीण भागात पाहुण्याच्या ताटात शेवची भाजी आवर्जून वाढली जाते. (How to Make Sev Tamatar ki Sabji) शेवची भाजी करण्याची सोपी झटपट रेसेपी पाहूया. गरमागरम चपात्या, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही शेवची भाजी खाऊ शकता. (How to make shev bhaji)

साहित्य

तेल

जिरे

बडीशेप

आले

हिरवी मिरची

- हिंग l हिंग

कढीपत्ता

कांदे

टर्मरिक पावडर

लाल मिरची पावडर

धणे पूड

गरम मसाला

टोमॅटो

चवीनुसार मीठ

पाणी

गूळ 

शेव

कोथिंबीर

कृती

 1) सगळ्यात आधी गॅसवर तेल गरम करायला ठेवा.

2) त्यात मोहोरी, जीरं, लसूण,आलं, मिरची, कांदा, मसाले, हळद घातल्यानंतर पाणी, मीठ घाला.

3) पाणी उकळल्यानंतर शेव घाला. त्यानंतर कोथिंबीर घालून शेव भाजी सर्व्ह करा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न