श्रावणी सोमवारचे व्रत अनेकजण उत्साहात करतात. बऱ्याच घरांमध्ये तर असं दिसून येतं की अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळेच जण श्रावणी सोमवार करतात. ज्यांना सगळेच श्रावणी सोमवार करणं जमत नाही, ते पहिला आणि शेवटचा श्रावणी सोमवार तर हमखास करतात. आता दिवसभर उपवास करायचा म्हणजे अनेकांना गळून गेल्यासारखं होतं. काही जणांना ॲसिडीटीचा त्रासही होतो (Shravan fast and food). म्हणूनच अशावेळी काहीतरी हलकेफुलके पदार्थ आपल्या आहारात असायला हवे. त्यापैकी एक म्हणजे साबुदाणा खीर. आपल्याकडे आजारी व्यक्तीला लवकर ताकद यावी म्हणून साबुदाणा खीर दिली जाते (how to make sabudana kheer?). श्रावणी साेमवारच्या उपवासासाठीही तो पदार्थ अगदी उत्तम आहे (sabudana kheer recipe for shravani somvar fast). म्हणूनच आता पाहूया अगदी झटपट पौष्टिक साबुदाणा खीर कशी करायची..
साबुदाणा खीर करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी साबुदाणा
१ लीटर दूध
श्रावणी सोमवार विशेष रांगोळी डिझाईन्स! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येईल सुंदर रांगोळी
काजू, बदाम, पिस्ता यांचे काप मनुका असं सगळं मिळून २ ते ३ टेबलस्पून
१ टेबल स्पून साजुक तूप
१ वाटी साखर
कृती
साबुदाणा खीर करण्यासाठी साबुदाणा ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर थोडं जास्त पाणी घालून २ तास भिजत घाला.
पायाचे घोटे काळवंडून घट्टे पडले? १ सोपा उपाय- टॅनिंग, डेडस्किन जाऊन पाय स्वच्छ होतील
यानंतर गॅसवर दूध गरम करायला ठेवा. दूधाला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये केशराच्या काड्या घाला आणि ते आणखी थोडं उकळू द्या. यानंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा हळूहळू घाला. साबुदाणा दुधामध्ये घालत असताना एका हाताने दूध सतत हलवत ठेवा.
यानंतर त्यामध्ये साखर घाला. पुन्हा एकदा १० ते १५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर दुधाला उकळी येऊ द्या. यानंतर गॅस बंद करा. आता एका छोटी कढई गॅसवर गरम करायला ठेवा.
त्यामध्ये थोडं साजुक तूप घाला आणि त्यामध्ये सुकामेव्याचे सगळे काप हलकेसे तळून घ्या. यानंतर सुकामेव्यासह तूप खीरीमध्ये घाला. सगळी खीर एकदा व्यवस्थित हलवून घ्या. गरमागरम पौष्टिक साबुदाणा खीर झाली तयार.