Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > न भिजवता- न वाटता करा वाटीभर तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा; सोपी पद्धत

न भिजवता- न वाटता करा वाटीभर तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा; सोपी पद्धत

How To Make Rice Flour Dosa : तांदळाचे पीठ अगदी बारीक दळलेले असावे. जर पीठ रवाळ असेल तर जाळी पडायला अडथळा येतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:23 IST2026-02-08T16:14:31+5:302026-02-09T17:23:34+5:30

How To Make Rice Flour Dosa : तांदळाचे पीठ अगदी बारीक दळलेले असावे. जर पीठ रवाळ असेल तर जाळी पडायला अडथळा येतो.

How To Make Rice Flour Dosa : Rice Flour Dosa Recipe How To Make Rice Floor Dosa | न भिजवता- न वाटता करा वाटीभर तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा; सोपी पद्धत

न भिजवता- न वाटता करा वाटीभर तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा; सोपी पद्धत

डोसा करायचा म्हटलं की डाळ-तांदूळ आधी भिजवावे लागतात नंतर दळून पीठ आंबवावे लागते. जर तुमच्याकडे फार वेळ नसेल तर तुम्ही तयार तांदळाच्या पिठाचा वापर करून झटपट मऊसूत डोसा बनवू शकता.  काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुम्ही झटपट डोसे करू शकता.  तांदळाच्या पिठाचे पदार्थ जसं की घावणे, आंबोळी किंवा डोसा मऊ आणि छान जाळीदार होण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स तुमच्या कुकिंग स्किल्स वाढवू शकतात. (Rice Flour Dosa Recipe)

तांदळाचे पीठ अगदी बारीक दळलेले असावे. जर पीठ रवाळ असेल तर जाळी पडायला अडथळा येतो. जाळीदार घावणे किंवा डोसे करण्यासाठी पीठ पातळ असावं लागतं. पीठ जर घट्ट असेल तर ते तव्यावर पसरत नाही आणि जाळी पडत नाही. ताक किंवा पातळ दुधासारखे पिठाचे स्वरूप ठेवावे. (How To Make Rice Floor Dosa)

 पिठाची पूर्वतयारी

जर तुम्हाला आंबोळी करायची असेल तर पीठ किमान 7 ते 8 तास उबदार ठिकणी ठेवावे. पिठामध्ये नैसर्गिक हवा भरली की जाळी आपोआप पडते. जर तुम्ही झटपट घावणे करत असाल तर पीठ भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पीठ लवचीक होतं.

जाळी पडण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तव्याचे तापमान तवा पूर्णपणे तापलेला असतानाच त्यावर पीठ ओता. तवा थंड असेल तर जाळी पडण्याऐवजी पिठाचा थर साचतो. पीठ तव्याच्या कडेनं ओतायला सुरूवात करून मध्यभागी यावे. ओतताना हात थोडा उंचावर धरून वेगानं ओतले की जाळी उत्तम पडते. पिठात एखादा चमचा बारीक रवा किंवा साबुदाण्याचे पीठ मिसळल्याने पदार्थ कुरकुरीत होतो आणि जाळी टिकून राहते.

तव्याला तेल लावताना अर्ध्या कापलेल्या कांद्यानं तेल पसरवा. यामुळे पीठ तव्याला चिकटत नाही आणि जाळी छान पडते. पिठात थोडं आंबट ताक मिसळल्यानंही छान जाळी पडण्यास मदत होते.  प्रत्येक डोसा किंवा घावण काढण्यापूर्वी पीठ नीट ढवळून घ्या. कारण तांदळाचे पीठ तळाला बसते ज्यामुळे वर पातळ थर असतो.

Web Title : चावल के आटे से कुरकुरा डोसा: झटपट, बिना भिगोए, बिना पीसे!

Web Summary : चावल के आटे का उपयोग करके तुरंत, नरम डोसा बनाएं! भिगोने और पीसने से बचें। मुख्य सुझाव: बारीक पिसा हुआ आटा, पतला घोल, गर्म तवा का प्रयोग करें। इन सरल युक्तियों से जालीदार बनावट पाएं।

Web Title : Crispy, Lacy Dosa from Rice Flour: Quick, No Soak, No Grind!

Web Summary : Make instant, soft dosa using rice flour! Skip soaking and grinding. Key tips: use finely ground flour, thin batter, hot pan. Get a lacy texture with these simple tricks.