Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टाँरंटसारखा मऊ, सुंगधित जीरा राईस घरीच करा; ५ स्मार्ट ट्रिक्स, रेसिपीसह, झटपट बनेल राईस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:19 IST

How To Make Restaurant Style Jeera Rice At Home : हॉटेलसारखं टेक्स्चर घरी केलेल्या भाताला येण्यासाठी तांदूळ निवडण्यापासून ते भात शिजवण्यापर्यंत अनेक ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात.

हॉटेलमध्ये मिळणारा जीरा राईस (Jeera Rice) पाहताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं याचं कारण म्हणजे जीरा राईसचा लांबसडक दाणा आणि सुंगध. अनेकदा आपण घरी शिजवतो तो भात चिकट होतो, गचका होतो पण हॉटेलमधला भात कधीच चिकट होत नाही नेहमी मोकळा दिसतो. हॉटेलसारखं टेक्स्चर घरी केलेल्या भाताला येण्यासाठी तांदूळ निवडण्यापासून ते भात शिजवण्यापर्यंत अनेक ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात. (How To Make Restaurant Style Jeera Rice At Home)

 रेस्टाँरंटमध्ये मिळतो तसा भात  करण्यासाठी जुन्या बासमती तांदळाचा वापर करा. तांदूळ हलक्या हातानं ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या. जेणेकरून त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. यानंतर तांदूळ किमान २० ते ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहेत. ज्यामुळे शिजवताना तांदळाचा दाणा तुटत नाही आणि दुप्पट फुलतो.

जीरा राईसची खरी चव त्याच्या फोडणीत दडलेली असते. तेलाऐवजी साजूक तुपाची फोडणी दिली किंवा बटरचा वापर केल्यास भाताला हॉटेलसारखी चकाकी आणि चव येते. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात जिरं, तमालपत्र, लवंग आणि  दालचिनीचा तुकडा घाला. जिरं छान तडतडल्यावर त्यात भिजवलेला आणि निथळलेला तांदूळ घाला. 

पोहे कधी गचके कधी खूप कोरडे होतात? ६ चुका टाळा, मऊसूत, चविष्ट होतील बटाटे पोहे

सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे पाणी घालण्यापूर्वी  हा तांदूळ तुपावर १ ते २ मिनिटं अतिशय  हलक्या हातानं परतवून घ्या. या प्रक्रियेमुळे तांदळाच्या प्रत्येक दाण्यावर तुपाचे कोटिंग व्यवस्थित बसते. ज्यामुळे शिजताना भात एकमेकांना चिकटत नाही आणि मोकळा होतो.

पाण्याचे प्रमाण हे भात  मोकळा होण्यासाठी  महत्वाचे असते. १ वाटी तांदळासाठी साधारणपणे दीड ते पावणे दोन वाट्या गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून सुरूवातीला मोठ्या आचेवर पाणी उकळवून  घ्या. पाणी आटल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजवून घ्या.

थंडीत करा उडुपीस्टाईल गरमागरम रस्सम; मऊ भातासोबत खा चवदार रस्सम-तोंडाला येईल चव

भात शिजल्यावर गॅस बंद करून लगेच झाकण उघडू नका. त्याला १५ ते १० मिनिटं वाफेवर व्यवस्थित मुरू द्या. शेवटी एका काट्याच्या चमच्यानं भात हलक्या हातानं मोकळा करा आणि त्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हा जीरा राईस डाळ फ्रायसोबत खायला मस्त लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Restaurant-style Jeera Rice at Home: Simple Tricks and Quick Recipe

Web Summary : Make fluffy, fragrant jeera rice at home using aged Basmati. Rinse and soak the rice. Sauté in ghee with cumin, bay leaf, cloves, and cinnamon. Add hot water, salt, cook, and rest before fluffing.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स