सकाळी नाश्त्याला झटपट काहीतरी करायचं असेल तर रवा इडली हा उत्तम पर्याय आहे. रवा इडली तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींनी बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. ढोकळ्यासारख्या दिसणाऱ्या मऊ, जाळीदार इडल्या करणं सोपं आहे. या इडल्या करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To make Rava Idli At Home)
रवा इडल्यांना पिवळा रंग आणि अधिक चविष्ट बनवण्यासाठी अनेक घरांमध्ये 'इन्स्टंट खमन ढोकळ्याच्या' पद्धतीचा वापर केला जातो. पिवळ्या रंगाची आणि लुसलुशीत रवा इडली कशी करायची याची सोपी कृती आणि साहित्य पाहूया. (Rava Idli Recipe)
एका भांड्यात रवा, दही, मीठ, साखर आणि हळद एकत्र करा. हळदीमुळे इडलीला छान पिवळा रंग येतो. त्यात थोडे पाणी घालून मध्यम घट्ट पीठ तयार करून घ्या. १५-२० मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा. एका लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे तडतडवून घ्या. ही खमंग फोडणी पिठात मिक्स करा. यामुळे ढोकळ्यासारखी चव इडलीमध्ये येते.
इडली पात्राला थोडं तेल लावा. पिठात इनो किंवा सोडा घालून हलके फेटा. लगेच हे पीठ साच्यात भरून १०-१२ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. ढोकळ्यासारखा 'स्पंज' हवा असेल, तर पिठात थोडा बेसन (डाळीचे पीठ) १-२ चमचे वापरू शकता, यामुळे पोत अधिक सुधारतो. वरून फोडणी देताना त्यात थोडे पाणी आणि साखर घालून 'सिरप' तयार करून इडलीवर ओतल्यास ती अगदी मार्केटमधील ढोकळ्यासारखी रसाळ लागते.
इडली अधिक रसाळ आणि ढोकळ्यासारखी बनवण्यासाठी मुख्य 'सिक्रेट' म्हणजे त्यावर दिलेली वरची फोडणी होय. इडल्या वाफवून तयार झाल्यावर, एका लहान पळीत तेल गरम करून त्यात मोहरी, भरपूर कढीपत्ता, लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पांढरे तीळ यांची खमंग फोडणी तयार करा.
या फोडणीत पाव वाटी पाणी आणि थोडी साखर घालून उकळ काढा, आणि हे मिश्रण गरम इडल्यांवर सर्व बाजूंनी पसरून ओता. यामुळे इडल्या हे पाणी शोषून घेतात आणि त्या अगदी ढोकळ्याप्रमाणे स्पंजी, रसाळ आणि चटपटीत लागतात. शेवटी, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा किस वरून पेरून या इडल्या सर्व्ह करा. अशा पद्धतीने तयार केलेल्या इडल्या दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात आणि चवीलाही खूप भन्नाट लागतात.
Web Summary : Make instant rava idli in minutes! This recipe creates soft, dhokla-like idlis perfect for a quick breakfast. Add a special tempering for extra flavor and moisture, making them a delicious and easy treat.
Web Summary : मिनटों में रवा इडली बनाएं! यह रेसिपी नरम, ढोकला जैसी इडली बनाती है जो झटपट नाश्ते के लिए एकदम सही है। अतिरिक्त स्वाद और नमी के लिए एक विशेष तड़का डालें, जिससे यह स्वादिष्ट और आसान बन जाता है।