Join us
Daily Top 2Weekly Top 5

मऊ-टम्म फुगणारे रव्याचे अप्पे करण्याची खास रेसिपी; जाळीदार होतील-झटपट होईल नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:53 IST

How To Make Rava Appe : घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही रव्याचे अप्पे करू शकता.

नाश्त्याला नेहमी चपाती, पोहे, असे पदार्थ  खाण्यापेक्षा वाटीभर रवा वापरून होणारे इंस्टंट अप्पे ट्राय केले तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण आनंदानं अप्पे खातील. अप्पे करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही रव्याचे अप्पे करू शकता. (How To Make Rava Appe)

रवा अप्पे करण्याासाठी लागणारं साहित्य

इन्स्टंट रवा अप्पे ही अतिशय झटपट होणारी आणि पौष्टीक रेसिपी आहे. यासाठी तुम्हाला  १ कप रवा, अर्धा कप दही, गरजेनुसार पाणी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर हे साहित्य लागेल. तर फोडीसाठी १ चमचा तेल, मोहोरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, इनो किंवा खाण्याचा सोडा हे साहित्य लागेल.

रवा अप्पे करण्याची सोपी पद्धत

एका मोठ्या बाऊलमध्ये  १ कप रवा आणि अर्धा कप दही एकत्र करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून मध्यम स्वरूपाचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण झाकून १० ते १५ मिनिटं बाजूला ठेवा. जेणेकरून रवा व्यवस्थित फुलेल.

एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून तडका तयार करा. हा तडका रव्याच्या मिश्रणात घाला. आता मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, किसलेलं गाजर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. जर हे मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घाला

अप्पे पात्रात अप्पे ठेवायच्या अगदी आधी मिश्रणात इनो किंवा खाण्याचा सोडा घाला आणि त्यावर थोडं पाणी घालून हलक्या हातानं मिक्स करा. यामुळे अप्पे छान जाळीार होतात. अप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवा आणि प्रत्येक खाच्यात थोडं तेल सोडा. चमच्याने मिश्रण त्या खाच्यात भरा. मंद आचेवर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटं वाफवून घ्या. खालची बाजू सोनेरी झाली की अप्पे उलटून दुसऱ्या बाजूनंही थोडं तेल सोडून भाजून घ्या. अप्पे जास्त कुरकुरीत हवे असतील तर पिठात १ ते २ चमचे तांदळाचे पीठ घालू शकता. हे अप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचअपसोबत अतिशय चवदार लागतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Soft, fluffy rava appe recipe: Quick, easy, and delicious breakfast.

Web Summary : Make instant rava appe with simple ingredients! Mix rava, yogurt, and veggies. Temper with spices, add to batter. Add baking soda for fluffiness. Cook in appe pan until golden. Enjoy with chutney!
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न