दक्षिण भारतीय जेवणाची खरी चव रस्समशिवाय (Rasam) अपूर्ण आहे. रस्सम हे केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठी आणि पचनासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. अस्सल साऊथ इंडियन स्टाईल रस्सम बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका मध्यम आकाराच्या लिंबाइतकी चिंच गरम पाण्यात भिजत घालून तिचा कोळ काढून घ्या.
एका पातेल्यात हा चिंचेचा कोळ, चिरलेलं टोमॅटो, कढीपत्ता, थोडी हळदी, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर गूळ मिसळून हे मिश्रण व्यवस्थित उकळू द्या. टोमॅटो मऊ होईपर्यंत हे मिश्रण शिजवणं महत्वाचे आहे. जेणेकरून चिंचेचा कच्चा वास निघून जाईल. (How To Make Rasam At Home)
रस्स्मची अस्सल चव ही मसाल्यावर अलंबून असते. तुम्हाला हॉटेलसारखी चव हवी असेल तर मसाला ताजा तयार करणं उत्तम ठरतं. यासाठी २ चमचे धणे, एक मोठा चमचा जिरं, अर्था चमचा काळी मिरी आणि २ सुक्या लाल मिरच्या खलबत्त्यात जाडसर कुठून घ्याव्यात. या मसाल्यामुळे रस्समला एक विशिष्ट तिखटपणा आणि सुगंध प्राप्त होतो. (Udupistyle Rasam Recipe)
पोहे कधी गचके कधी खूप कोरडे होतात? ६ चुका टाळा, मऊसूत, चविष्ट होतील बटाटे पोहे
चिंचेच्या पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आधीच शिजवून घेतलेली अर्धी वाटी तुरीची डाळ आणि गरजेनुसार दोन ते तीन वाट्या पाणी मिसळून घ्या. रस्सम नेहमी पातळ असावं. त्यामुळे पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा. आता त्यात तयार केलेला ताजा मसाला घालून एक उकळ काढून घ्या. रस्सम जास्त उकळल्यास त्याची चव कडवट होऊ शकते. त्यामुळे फक्त फेस येईपर्यंतच गरम करा.
सर्वात शेवटची आणि महत्वाची पायरी म्हणजे खमंग फोडणी, एका लहान कढईत थोडं साजूक तूप किंवा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, भरपूर हिंग, २ ते ३ लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालाव्यात. ही कडकडीत फोडणी रस्समवर घातल्यावर लगेच झाकण ठेवा. जेणेकरून फोडणीचा सुगंध रस्सममध्ये पूर्णपणे मुरेल. शेवटी भरपूर ताजी कोथिंबीर घालून हे रस्सम गरमागरम वाफाळलेल्या भातासोबत किंवा मेंदू वड्यासोबत सर्व्ह करा. हिवाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी रस्सम उत्तम पर्याय आहे.
