Join us

फक्त २ बटाट्यांमध्ये होतील २०० कुरकुरीत पापड; वर्षभर टिकतील अशी सोपी पापड रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 09:35 IST

How to make Potato Papad at Home : कमीत कमी बटाटे वापरून खमंग, कुरकुरीत पापड बनण्याची रेसेपी पाहूया.

जेवताना पापड खायला सर्वानाच आवडतं. पापड भाजलेला असो किंवा तळलेला पापड आवडत नाही असे खूप कमीजण असतील. डाळ भाताबरोबर खायला पापड असेल तर संपूर्ण जेवणाची  रंगत वाढते. (How to make batata papad) उन्हाळ्यात नाचणीचे, उडीदाचे पापड बनवले  जातात. तसंच उपवासाला खाता येतील असे बटाटा साबुदाण्याचे पापड, पळी पापड, साबुदाण चकल्याही बनल्या जातात. (How to make Potato Papad at Home) वर्षभर टिकणारे हे पापड बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. कमीत कमी बटाटे वापरून खमंग, कुरकुरीत पापड बनण्याची रेसेपी पाहूया. (Batata Papad Recipe)

बटाट्याचे पापड करण्याची सोपी रेसेपी

हे पापड करण्यासाठी सगळ्यात आधी २ बटाटे स्वच्छ धुवून सालं काढल्यानंतर पाण्यात किसून घ्या. पाण्यात बटाटे किसले नाही तर ते काळे  पडतात. यामुळे पापडांचा रंग बदलू शकतो.  त्यानंतर एक भांड्यात पाणी गरम करून त्यात चवीनुसार मीठ, किसलेला बटाटा घाला नंतर साबुदाणे घाला. हे मिश्रण  शिजल्यानंतर त्यात  चिली फ्लेक्स,  जीरं घाला. एका प्लास्टीकच्या कागदाला तेल लावून नंतर चमच्याच्या मदतीनं हे पापड घाला. २ ते ३ दिवस कडक उन्हात सुकल्यानंतर हे पापड तळून पाहा. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशलअन्न