Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चहा करताना पाण्यात आधी साखर घालावी की चहा पावडर? पाहा योग्य पद्धत-फक्कड चहाचं सिक्रेट

चहा करताना पाण्यात आधी साखर घालावी की चहा पावडर? पाहा योग्य पद्धत-फक्कड चहाचं सिक्रेट

How To Make Perfect Tea At Home : चहाची चव, रंग आणि सुगंध टिकवून ठेवण्यासाठी चहा पावडर आणि साखर योग्यवेळी घालावी लागते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:25 IST2026-01-09T16:46:01+5:302026-01-09T17:25:53+5:30

How To Make Perfect Tea At Home : चहाची चव, रंग आणि सुगंध टिकवून ठेवण्यासाठी चहा पावडर आणि साखर योग्यवेळी घालावी लागते.

How To Make Perfect Tea At Home : Tea Making Tips Tapristyle Milk Tea Making Tips | चहा करताना पाण्यात आधी साखर घालावी की चहा पावडर? पाहा योग्य पद्धत-फक्कड चहाचं सिक्रेट

चहा करताना पाण्यात आधी साखर घालावी की चहा पावडर? पाहा योग्य पद्धत-फक्कड चहाचं सिक्रेट

सकाळी उठल्यानंतर बरेचजण सगळ्यात आधी चहा घेतात. चहा घेतल्याशिवाय बऱ्याच जणांचा दिवस चांगला जात नाही तसंच चहाला अपेक्षित चवही येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे साहित्याचा चुकीचा क्रम. चहाची चव, रंग आणि सुगंध टिकवून ठेवण्यासाठी चहा पावडर आणि साखर योग्यवेळी घालावी लागते. (How To Make Perfect Tea At Home)

चहा पावडर घालण्याची योग्य पद्धत कोणती?

 अनेकजण पाणी, दूध आणि चहा पावडर एकत्र गॅसवर ठेवतात. ही पद्धत चहाची चव बिघडवू शकते. जेव्हा पाणी पूर्णपणे उकळतं तेव्हा त्यातून वाफा येऊ लागतात. तेव्हाच चहा पावडर घालावी. चहाच्या पानांमध्ये टॅनिन्स आणि नैसर्गिक सुगंधी द्रव्य असतात. (Tapristyle  Milk Tea Making Tips)

जर पावडर थंड पाण्यात घातली तर चहा कडू होऊ शकतो. उकळत्या पाण्यात पावडर घातल्यानं पानांमधील अर्क नैसर्गिकरित्या आणि सम प्रमाणात पाण्यात उतरतो. ज्यामुळे चहाला गडद लाल रंग आणि उत्तम चव मिळते. पावडर घातल्यानंतर साधारण १ ते दीड मिनिटं मध्यम आचेवर चहा उकळू द्या.

साखर कधी घालावी?

 साखर कधी घालावी यावर अनेक तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. तरी परफेक्ट चहासाठी साखर सर्वात शेवटी घालणं फायदेशीर ठरतं. चहामध्ये दूध घातल्यानंतर आणि चहाला उकळी आल्यावर साखर घाला. जर तुम्ही सुरूवातीलाच साखर घातली तर पाण्याचे तापमान वाढते आणि चहा पावडरचा अर्क हवा तसा उतरत नाही. साखर शेवटी घातल्यानं चहाचा स्वाद टिकून राहतो आणि चहाला एक प्रकारची चमक येते तसंच साखरेचे प्रमाणही अचूक राहते.

फक्कड चहा करण्याची स्टेप बाय स्टेप कृती

 सगळ्यात आधी पातेल्यात पाणी घेऊन ते कडक उकळवून घ्या.  त्याच वेळी किसलेलं आलं आणि वेलची घाला जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात उतरेल. पाणी उकळल्यावर गॅस मध्यम करा आणि चहा पावडर घाला. १ मिनिटं उकळ येऊ द्या.  आता त्यात दूध घाला. दुधामुळे चहाच्या कडवटपणाला एक गोडवा येतो आणि घट्टपणा येतो, साखर सर्वात  शेवटी घाला. नंतर एक मोठी उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर  १ ते २ मिनिटं कमी आचेवर ठेवा नंतर गॅस बंद करा. 

Web Title : परफेक्ट चाय: चीनी या चाय पत्ती पहले डालें? रहस्य खुला!

Web Summary : परफेक्ट चाय के लिए, चाय पत्ती उबलते पानी में डालें, ठंडे में नहीं। स्वाद और मिठास बनाए रखने के लिए चीनी अंत में डालें। यह विधि बढ़िया रंग और स्वाद सुनिश्चित करती है।

Web Title : Perfect Tea: Add Sugar or Tea Powder First? Secret Revealed!

Web Summary : For perfect tea, add tea powder to boiling water, not cold. Add sugar last to retain flavor and sweetness. This method ensures rich color and taste.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.