वरण चविष्ट होण्यासाठी फक्त डाळ शिजवणं महत्वाचं नसतं तर त्याला दिलेली फोडणी हा त्या पदार्थाचा आत्मा असतो. फोडणी देताना नेहमी साजूक तुपाचा वापर करावा (Fodniche Varan Recipe). कारण तुपामुळे वरणाला उत्तम चव येते. कुकरमध्ये वरण बनवल्यास ते अधिक चवदार आणि चविष्ट लागतं. उत्तम वरण तयार करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. (How To Make Perfect Tadka Dal At Home)
कुकरमध्ये चवदार वरण कसे करावे?
एक कप तुरीची डाळ घेऊन ती स्वच्छ पाण्यानं २ ते ३ वेळा धुवून घ्या. डाळ धुतल्यामुळे त्यातील पावडर किंवा अशुद्धता निघून जाते. पण डाळ धुताना जास्त चोळू नका. वेळ असल्यास डाळ १५ ते २० मिनिटं पाण्यात भिजवत ठेवा. यामुळे डाळ लवकर शिजते आणि ती पचायला हलकी होते.
केवळ पाणी घालून डाळ शिजवण्याऐवजी त्यात चिमूटभर हळद, थोडं हिंग आणि १ छोटा चमचा तेल किंवा तूप घाला. तेलामुळे डाळ मऊ शिजते आणि कुकरच्या शिट्टीवाटे पाणी बाहेर येत नाही. शिजवतानाच १ ते २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घातल्यास डाळीच्या कणाकणांत चव उतरते.
कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत
कुकरच्या भांड्यात धुतलेली डाळ घेऊन त्यात डाळीच्या दुप्पट किंवा अडीचपट पाणी घाला. त्यात चिमूटभर हळद, थोडं तेल आणि मीठ घाला. तेलामुळे डाळ मऊ शिजते आणि कुकरच्या शिट्टीवाटे पाणीही बाहेर येत नाही. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या करून घ्यायव्यात कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच झाकण उघडावं.
डाळीला फोडणी कशी द्यावी?
शिजलेली डाळ रव्हीनं किंवा चमच्यानं व्यवस्थित घोटून घ्यावी. डाळ एकजीव झाली की वरणाला छान दाटपणा येतो. वरणाची चव वाढवण्यासाठी सर्वात महत्वाची टिप म्हणजे साजूक तुपाची फोडणी. फोडणीत लसूण वापरणार असाल ठेचून घाला आणि गुलाबी होईपर्यंत परतवून घ्या.
ओटी पोट लटकतंय-फिगरच बिघडली? सकाळी उठल्यावर १ काम करा-मेणासारखी वितळेल चरबी
फोडणी दिल्यावर लगेच कुकरचं झाकण ५ मिनिटांसाठी बंद ठेवा जेणेकरून फोडणीचा सुगंध बाहेर जाणार नाही. त्यात थोडं गरम पाणी घालून वरणाची सुसंगता संतुलित करा. अशाप्रकारे तयार केलेल्या वरणाला खमंग फोडणी दिल्यास साध्या भातासोबत किंवा चपातीसोबतही चवदार लागते.
