Join us

तीन पदरी घडीची पोळी करण्याची खास पद्धत; मऊ-लुसलुशीत होतील चपात्या-भरपूर पदर सुटतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:47 IST

How To Make Perfect Soft Layerd Chapati (Ghadichi poli kashi kartat) : चपाती लाटताना काही ट्रिक्स फॉलो केल्या जातात ज्यामुळे या चपातीला भरपूर लेअर्स येतात आणि मऊ होते.

भारतात प्रत्येकाच्याच घरी चपात्या (Ghadichi Poli) खाल्ल्या जातात. प्रत्येक घरांत चपाती करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहीजणांच्या घरी चपात्या फुलक्यांसारख्या छोट्या असतात तर काहीजणांच्या घरी मोठ्या चपात्या खाल्ल्या जातात. भरपूर पदर सुटलेली चपाती अनेकदा ग्रामीण भागात केली जाते (Cooking Hacks). अशी चपाती खूपच मऊ आणि रूचकर लागते. ही चपाती करण्याची खास  ट्रिक आहे. चपाती लाटताना काही ट्रिक्स फॉलो केल्या जातात ज्यामुळे या चपातीला भरपूर लेअर्स येतात आणि मऊ होते.  घडीची म्हणजे भरपूर पदर सुटणारी चपाती कशी करायची ते पाहूया.(Ghadichi Chapati Recipe)

घडीची चपाती करण्याची सोपी पद्धत (How To Make Perfect Soft Layerd Chapati)

दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला. पाणी हळूहळू अंदाज घेऊन मग घाला. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल नसावं. साधारण ५ ते ७ मिनिटं पीठ व्यवस्थित मळून घ्या. कणिक जितकी जास्त मळली जाईल तितकंच ते मऊ होईल. मळताना त्यात थोडंसं तेल वापरू शकता. चवीनुसार मीठ घाला. पीठ मळून झाल्यानंतर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटं बाजूला ठेवून द्या. यामुळे पिठातील ग्लुटेन व्यवस्थित सेट होईल आणि चपातीला मऊपणा येईल.

भरपूर पदर सुटण्याासाठी खास ट्रिक (Use These Trick for Perfect Soft Layerd Chapati)

भिजवलेल्या कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याला आधी गोल, लहान पुरीच्या आकारात लाटा. या लाटलेल्या पुरीवर थोडासा तेल किंवा तुपाचा हात लावा त्यावर सुकं पीठ लावा. आता या पुरीची अर्धी घडी करा. पुन्हा या अर्ध्या  घडीवर किंचित तेल आणि सुकं पीठ लावा. आता या अर्ध चंद्रकृती भागाची पुन्हा एक अर्धी घडी घाला आणि त्रिकोणी आकार द्या. हा तयार त्रिकोणी आकार तुमच्या पदर सुटलेल्या चपातीचा आधार आहे. यामुळे चपातीला तीन पदर मिळतात.

चपाती लाटणे आणि शेकणे

त्रिकोणी गोळ्याला सुक्या पिठात घोळवून हलक्या हातानं गोलाकार लाटा. लाटताना चपाती पातळ लाटण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून पदर चांगले सुटतील. तवा चांगला गरम झाल्यावर मंद ते मध्यम आचेवर चपाती घाला. एका बाजूनं हलकी शेकल्यांतर लगेच उलटा. दुसऱ्या बाजूनं शेकताना ती टम्म फुगण्यास मदत होते. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत शेका. तव्यावरून काढल्यानंतर लगेच चपातीला तूप लावा यामुळे चपातीची चमक वाढते आणि अधिक मऊ राहते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Flaky Chapati Recipe: Make soft, layered Indian flatbread easily at home.

Web Summary : Learn the secret to making soft, layered chapatis. This recipe details a special folding technique with oil and flour for perfect layers. Cook on medium heat and apply ghee for extra softness and shine.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न