वरण भात किंवा खिचडी प्रत्येक घरांमध्ये केली जाते. तांदूळ कसा शिजवावा, तांदळासाठी किती पाणी घ्यावं याबाबत लोक संभ्रमात असतात. अनेकदा कुकरमध्ये शिजवलेले तांदूळ मऊ मोकळे नसतात. यामुळे अन्नाची चव बिघडते. कुकरमध्ये शिजवलेला भात अनेकदा गचका होतो, व्यवस्थित शिजत नाही अशी अनेकांची तक्रार असते. तांदूळ व्यवस्थित शिजण्यासाठी ७ टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. (How To Make Perfect Rice In Cooker)
योग्य तांदळाची निवड
चांगला भात शिजण्यासाठी तुम्ही कोणते तांदूळ निवडता हे फार महत्वाचे असते. रोजच्या आहारात लॉग्न ग्रेन तांदूळ, आंबेमोहोर, कोलम, इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ वापरू शकता. यात स्टार्च कमी असते ज्यामुळे तांदूळ मऊ मोकळा होतो.
तांदूळ व्यवस्थित धुवा
भात शिजवण्याआधी तांदूळ २ ते ३ वेळा व्यवस्थित धुवून घ्या. यामुळे तांदूळातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जातं आणि तांदूळ चिकट होत नाही. पाणी ट्रांसपरेंट दिसत नाही तोपर्यंत बदलत राहत राहा.
तांदूळ शिजवण्याआधी भिजवून ठेवा
जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तांदूळ १५ ते २० मिनिटांसाठी भिजवून ठेवा. यामुळे तांदूळ मऊ होतील आणि भात चांगला शिजेल.
पाणी आणि तांदळाचं योग्य प्रमाण
कुकरमध्ये तांदूळ शिजवण्याचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे १ कप तांदूळासाठी २ कप पाणी, १ कप बासमती तांदळासाठी तुम्ही दीड कप पाणी वापरू शकता.
कुकरमध्ये भात असा घाला
कुकरमध्ये सगळ्यात आधी तांदूळ घाला नंतर पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी घाला. २ ते ३ थेंब तेल किंवा अर्धा चमचा तूप घाला. ज्यामुळे तांदूळ चिटकणार नाहीत आणि सुगंध वाढेल. याव्यतिरिक्त तुम्ही २ ते ३ थेंब लिंबाचा रस घालू शकता. या टिप्सच्या मदतीनं तांदूळ एकदम परफेक्ट बनतील.
किती शिट्ट्या घ्याव्यात
लोक जास्त शिट्ट्या घेतात त्यामुळे भात बिघडतो. साध्या भातासाठी २ शिट्ट्या तर बासमती तांदळासाठी कुकरची १ शिट्टी पुरेशी असते.
भात लगेच वाढू नका
कुकर उघडल्यानंतर भात लगेच वाढू नका. आधी ५ मिनिटं असंच ठेवा. त्यानंतर चमचा किंवा हलक्या हातानं तांदूळ दाबून तपासून पाहा. त्यामुळे दाणे मऊ-मोकळे शिजले आहेत की नाही ते कळण्यास मदत होईल.
Web Summary : Achieve perfect rice in a cooker by selecting the right grain, washing thoroughly, soaking beforehand, and using the correct water ratio. Add oil or ghee, cook for the right number of whistles, and let it rest before serving.
Web Summary : सही अनाज चुनें, अच्छी तरह धोएं, भिगोकर रखें और सही पानी का अनुपात रखें। तेल या घी डालें, सही सीटी आने तक पकाएं और परोसने से पहले आराम करने दें। कुकर में एकदम सही चावल बनाएं।