Join us

How to Make Perfect Puri for Gudi Padwa : खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्यांचं सोपं सिक्रेट; १० मिनिटात करा कमी तेलकट, क्रिस्पी पुऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:42 IST

How to Make Perfect Puri for Gudi Padwa : पीठ मळण्यापासून शेवटची पूरी तळेर्यंत तासनतास किचनमध्ये घालवावे लागतात.  एव्हढं करूनही पुरी व्यवस्थित फुगली नाही किंवा  जास्त तेलकट झाली तर खातानाही मजा येत नाही.

गुढी पाडव्याला (Gudi Padwa 2022) घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पुरी बनवणं म्हणजे वेळखाऊ काम. पीठ मळण्यापासून शेवटची पूरी तळेर्यंत तासनतास किचनमध्ये घालवावे लागतात.  एव्हढं करूनही पुरी व्यवस्थित फुगली नाही किंवा  जास्त तेलकट झाली तर खातानाही मजा येत नाही.  काही ठिकाणी घरातल्या मंडळींकडून जेवणाला नावं ठेवली जातात ते वेगळंच. म्हणून या लेखात पुऱ्या करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळात टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवू शकता. (Perfect puri making tips for gudi padwa)

पुरी बनवताना या टिप्स लक्षात ठेवा (Perfect puri making Tricks and Tips)

१) पुरीच्या पीठात गहू आणि मैदा सम प्रमाणात घ्या किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मैद्यामुळे पुरीला कुरकुरीतपणा येतो.

२) पीठ मळण्याआधी तेलाचं मोहन घालायला विसरू नका

३) पीठ सैल असेल तर पुरी फुगत नाही. त्यामुळे पीठ घट्ट मळा एकत्र पाणी घालण्यापेक्षा हळू हळू पाणी घाला.

४) लाटलेल्या पुऱ्या एकावर एक ठेवू नका, अन्यथा ते चिटकण्याची शक्यता असते.

५) पुरी तळताना तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच सुरूवात करावी.

६) पुरी गरमागरम वाढणार असाल तर मंद आचेवर तळा.

1) 

२) 

३) 

टॅग्स :अन्नपाककृतीगुढीपाडवाभारतीय उत्सव-सण