Join us

पोहे वातड होतात कधी गचका होतो? ४ खास टिप्स, कापसासारखे मऊ-मोकळे होतील कांदापोहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 20:48 IST

How To Make Perfect Poha : पोहे थोडे गोडसर आवडत असल्यास त्यात थोडी साखर घाला.

सकाळचा नाश्ता  (Breakfast) म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे गरमागरम पोहे (Pohe). महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आणि नाश्त्याच्या गाडीवर पोह्यांचा सुगंध दरवळतो. पण अनेकांची एकच तक्रार असते ती म्हणजे, पोहे कधी गचके होतात तर कधी खूपच कडक'. यामागे पोहे बनवण्याचं सोपं गणित दडलं आहे. पोहे करण्याची योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट पोहे बनवू शकता. पोहे भिजवण्यापासून ते सर्व्ह करण्यापर्यंत कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करायच्या ते पाहूया. (How To Make Poha Soft And Perfect)

पोहे निवडताना घ्यायची काळजी

पोहे करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोह्यांचा प्रकार. बाजारात जाड पोहे आणि पातळ पोहे असे दोन प्रकार मिळतात. आपल्याला पोहे बनवण्यासाठी फक्त जाड पोहे वापरायचे आहेत. पातळ पोहे चिवड्यासाठी योग्य असतात.

सणासुधीला पांढरे केस नको? नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ कालवून लावा, ५ मिनिटांत केस काळेभोर

पोहे भिजवण्याची योग्य पद्धत

पोहे चाळणीमध्ये घ्या. त्यावर लगेच पाणी घाला पाणी जास्त कमी घालू नका. पण ते फार वेळ पोह्यांमध्ये थांबू देऊ नका. लगेचच चाळणी हलवून अतिरिक्त पाणी काढून टाका. पोहे लगेचच एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात थोडं मीठ आणि हळद घाला. मिश्रण हळूवारपणे एकत्र करा.यामुळे पोह्यांना रंग चांगला येतो आणि ते चिकटत नाही. पोहे भिजवण्यासाठी त्यांना फार वेळ पाण्यात ठेवण्याची गरज नाही. जास्त वेळ पाण्यात ठेवल्याने पोहे गचके होतात. पाणी लगेचच काढून टाकल्यामुळे पोहे फक्त ओलसर होतात आणि नंतर वाफेने ते छान फुलतात.

वाफेवर शिजवणं आहे महत्त्वाचं

पोहे फोडणीमध्ये घातल्यानंतर,त्यांना जास्त वेळ परतू नका. फोडणी आणि पोहे एकत्र झाल्यावर लगेचच भांड्यावर झाकण ठेवून गॅस मंद करा. वाफेवर पोहे छान मऊ आणि सुटसुटीत होतात. यामुळे पोह्यांना एकसारखी वाफ मिळते आणि ते मऊ राहतात.

दुधावर जाडजूड साय येण्यासाठी पाहा दूध तापवण्याची खास ट्रिक, घरीच करा भरपूर साजूक तूप

साखर आणि लिंबू

पोहे थोडे गोडसर आवडत असल्यास त्यात थोडी साखर घाला. साखरेमुळे पोह्यांना गोडवा येतो . सर्वात शेवटी, गॅस बंद केल्यानंतर थोडा लिंबाचा रस पिळा. यामुळे पोह्यांची चव वाढते.पोह्यांची चव वाढवण्यासाठी फोडणीमध्ये शेंगदाणे तळून घाला.सर्व्ह करण्यापूर्वी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेल्या ओल्या नारळाने सजवा. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही प्रत्येक वेळी मऊ आणि सुटसुटीत पोहे बनवू शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स