नीर डोसा... नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते! कर्नाटकातील किनारी प्रदेशातील हा एक अतिशय हलका, जाळीदार आणि मऊ, लुसलुशीत डोशाचा प्रकार आहे, जो खाण्यासाठी जितका चविष्ट, तितकाच तयार करण्यासाठी देखील सोपा आहे. 'नीर' म्हणजे पाणी, आणि या नावानुसारच, हा डोसा अत्यंत पातळ आणि पांढराशुभ्र असतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नीर डोसा तयार करण्यासाठी ना जास्त तांदूळ लागतो,ना जास्त तेल! आजच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये, जेव्हा आपण आरोग्याबद्दल अधिक जागरूक झालो आहोत, तेव्हा फक्त वाटीभर तांदूळ वापरून आणि तेही (How To Make Perfect Neer Dosa At Home) अगदी कमी तेलात, इतका पौष्टिक आणि पचायला हलका नाश्ता तयार करता येतो. पारंपारिक डोशाप्रमाणे यात डाळी आणि आंबवण्याची प्रक्रिया करण्याची गरज नसते, त्यामुळे वेळेचीही बचत होते(authentic neer dosa method).
फक्त वाटीभर तांदूळ वापरून तयार होणारा हा मऊ, पातळ आणि अगदी हलका नीर डोसा फक्त चविष्टच नाही तर पचायलाही उत्तम आणि हलका असतो. सकाळचा नाश्ता, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा हलक्या जेवणासाठी हा डोसा एकदम उत्तम...याशिवाय यासाठी फार तेलाची गरज नाही, कमी तेलात झटपट तयार होणारा हा पारंपारिक नीर डोसा झटपट (Karnataka style neer dosa) तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात...
झटपट नीर डोसा तयार करण्याची पद्धत...
१. तांदूळ भिजवण्याची आणि बॅटर तयार करण्याची पद्धत :- सर्वप्रथम, एक वाटी तांदूळ घ्या आणि ते एका बाऊलमध्ये काढून घ्या. तांदळातील सर्व स्टार्च निघून जावा यासाठी, तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता जर तुम्हाला डोसा सकाळी तयार करायचा असेल, तर तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. तुमच्याकडे वेळ कमी असल्यास, तुम्ही तांदूळ गरम पाण्यात १ ते २ तास देखील भिजवून ठेवू शकता. तांदूळ चांगल्या प्रकारे भिजणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून वाटताना त्याचे एकसमान गुळगुळीत बॅटर तयार होईल.
गाजर न किसता कुकरमध्ये गाजर हलवा करण्याची झटपट रेसिपी, होईल इतका मस्त की खातच राहावा...
२. डोशाचे बॅटर तयार करताना :- आता भिजवलेले तांदूळ पाण्यातून काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावे. यामध्ये अर्धा कप किसलेले खोबर घाला. जर तुम्हाला नारळाची चव आवडत नसेल, तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल. चवीनुसार मीठ मिसळा आणि थोडेसे पाणी घालून याची अगदी गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्या.
३. डोशासाठी तवा किंवा कढई तयार करणे :- नीर डोसा तेलाशिवाय तेव्हाच तयार करता येईल, जेव्हा तवा योग्यरित्या सिझन केलेला असेल. डोसा बनवण्यासाठी एक साधा तवा घ्या, किंवा ज्याच्या कडा किंचित वर उचललेल्या असतील असा तवा निवडा. कडा वर उचललेल्या असल्यामुळे बॅटर पसरवणे सोपे होते. आता तवा गॅसवर ठेवा आणि त्यावर हलके तेल घाला. आता हे तेल एका टिश्यू पेपरच्या मदतीने चांगल्या प्रकारे पुसून टाका. नीर डोशाचे बॅटर हे पारंपारिक डोशाच्या बॅटरपेक्षा खूप पातळ असते. जर बॅटर घट्ट वाटले, तर त्यात थोडे आणखी पाणी मिसळून ते पातळ करून घ्या. या कृतीमध्ये फक्त तव्याला 'सिझनिंग' करण्यासाठीच तेलाची गरज लागेल. एकदा सिझनिंग झाल्यावर, तुम्ही पुढचा डोसा तेलाशिवायही तयार करु शकता.
कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...
४. नीर डोसा तयार करण्याची योग्य पद्धत :- तवा चांगला गरम झाल्यानंतर, नीर डोसा बनवण्यासाठी पळीच्या मदतीने पातळ बॅटर तयार करून घ्या. लक्षात ठेवा की, पळीतील बॅटर तव्यावर अशाप्रकारे टाकायचे आहे जसे ते गोलाकार आकारात पसरवत आहात. बॅटर पसरवण्यासाठी तुम्ही तव्याला हलकेच गोलाकार आकारात फिरवू देखील शकता. बॅटर पातळ असल्यामुळे, तव्यावर टाकताच त्यामध्ये सुंदर जाळी तयार होईल. ही जाळीच नीर डोशाची खरी खासियत आहे.
५. डोसा व्यवस्थित शिजवून घ्या :- नीर डोसा शेकण्याची पद्धत आपल्या नेहमीच्या डोशापेक्षा थोडी वेगळी असते. हा जाळीदार डोसा थोड्याच वेळात शेकला जातो, त्यामुळे तुम्हाला तो दोन्ही बाजूंनी शेकण्याची गरज नसते. लक्षात ठेवा की, तुम्हाला नीर डोसा तपकिरी किंवा कुरकुरीत करायचा नाही. तो पांढरा आणि नरम व मऊच राहतो. जेव्हा डोसा हलकासा सुकेल आणि कडा सोडायला लागेल, तेव्हा तो तव्यावरून काढून घ्या. खोबऱ्याची चटणी, सांबार किंवा तुमच्या आवडीच्या भाजीसोबत गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करावा.