कांदा पोहे (Kanda Pohe) हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नाश्ता आहे. कांदा पोहे करायला सोपे असतात. पण हे पोहे परफेक्ट करण्यासाठी काही महत्वपू्र्ण गोष्टींची काळजी घ्यायला हवी (Kanda Poha Making Tips). जर तुम्हाला मऊ-मोकळे, चविष्ट पोहे हवे असतील तर काही टिप्स लक्षात घ्यायला हव्यात. कांदा पोह्यांना व्यवस्थित चव येण्यासाठी त्यात बरेच पदार्थ तुम्हाला घालता येतील. (How To Make Perfect Kanda Poha)
जाड पोहे निवडा
कांदा पोहे करण्यासाठी नेहमी जाड पोह्यांची निवड करा. पोहे पातळ असतील तर पोहे भिजवल्यानंतर लगेचच गळून पडतात. पोहे एक किंवा २ पाण्यानं स्वच्छ धुवा. ज्यामुळे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. पोहे काहीवेळ पाण्यात भिजवलेले राहू द्या. ज्यामुळे चव चांगली लागेल.
फोडणी
फोडणी तयार करताना पुरेश्या प्रमाणात तेलाचा वापर करा. कोरडे पोहे जराही चांगले लागत नाहीत. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी घाला. त्यानंतर शेंगदाणे घाला. शेंगदाणे लाल झाल्यानंतर कांदा घालून एकत्र तळून घ्या.
कांदा आणि भाज्यांचा योग्य ताळमेळ
कांदा-पोह्यांमध्ये कांद्याचे प्रमाण पुरेसं असायला हवं. कांदा एकदम बारीक चिरू नका, थोडा-मध्यम चिरा. कांदा जास्त करपवू नका. गुलाबी, मऊ झाल्यानंतर कांदा लगेच त्यात पोहे घाला. तिखटपणासाठी ताजी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला.
काही सेकंदांसाठी झाकण ठेवा
जेव्हा तुम्ही पोहे कराल तेव्हा फोडणी दिल्यानंतर एकजीव करून थोडावेळ झाकण ठेवा. वाफ फिरल्यानंतर पुन्हा झाकण काढून टाका. या ट्रिकमुळे पोहे कापसासारखे मऊसूत होतात. काहीजण झाकण ठेवत नाहीत फक्त पोहे चाळत राहतात अशी चूक करू नका.
गार्निशिंग आणि सर्विंग
सर्वात शेवटी पोह्यांमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक केलेलं ताजं नारळ घाला. यात वरून लिंबाचा रस आणि थोडी बारीक शेव घालायला विसरू नका. या सोप्या ट्रिक्समुळे तुम्ही केलेले कांदा-पोहे एकदम हॉटेलमध्ये करतात तसेच मऊ-मोकळे होतील. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा काजूसुद्धा घालू शकता. ज्यामुळे पोह्यांना छान चव येईल.
