भाताबरोबर गरमागरम तुरीची डाळ मिळाली तर चव अप्रतिम लागते. ही डाळ चविला जितकी चांगली असते तितकीच तब्येतीलाही उत्तम असते. या डाळीत प्रोटीन्स, फायबर्स, कार्ब्स, आयर्न कॉपर, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. व्हेजिटेरियन लोकांसाठी हा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. अनेकजण हाय प्रोटीन डाळी व्यवस्थित पचवू शकत नाहीत. नंतर पोटात गॅस तयार होतो. तुरीची डाळ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं परफेक्ट बनवू शकता. जे खाल्ल्यानंतर तुम्हाला गॅसची समस्या उद्भवणार नाही. (How To Make Perfect Arhar Dal Without Bloating Problems)
तुरीची डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
तुरीची डाळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुरीची डाळ व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यानंतर कमीत कमी अर्धा तास किंवा २ तासांसाटी पाण्यात भिजवून ठेवा. असं केल्यानं डाळ पचायला वेळ लागणार नाही, सहज पचेल.
प्रेशर कुकरमध्ये एक कप डाळ असेल तर तुम्ही यात ३ कप पाणी घाला. नंतर तुम्ही १ चमचा हळद आणि १ चमचा मीठ घाला. तुरीच्या डाळीसोबत तुम्ही बारीक केलेला लसूण, एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालू शकता जेणेकरून त्याची चव अधिक चांगली येईल. लसूण न घालतासुद्धा तुम्ही ही डाळ बनवू शकता.
प्रेशर कुकरमध्ये ३ ते ४ शिट्या येईपर्यंत मिडीयम आचेवर ठेवा. तुम्ही कमी आचेवर ठेवलं तर शिट्टी व्यवस्थित तयार होणार नाही आणि हाय फ्लेम असेल तर डाळ व्यवस्थित शिजणार नाही. शिट्टी घेतल्यानंतर गॅस बंद करा. वाफ निघण्याची वाट पाहा.
नंतर ताक घुसळण्याचे यंत्र वापरून डाळ बारीक करून घ्या. यासाठी तुम्ही कढई गॅसवर ठेवून त्यावर २ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात चुटकीभर हिंग, जीरं, लाल मिरची घालून फोडणी द्या. तयार आहे हेल्दी तुरीची डाळ.