Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिळ्या भाजीचे गरमागरम टेस्टी पराठे, आजीबाईच्या स्वयंपाकघरातलं सिक्रेट - ५ मिनिटांत हॉटेलसारखे खरपूस पराठे ताटात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2026 14:43 IST

how to make paratha with leftover vegetables : leftover dry sabji paratha : paratha from leftover sabji : उरलेली भाजी फेकू नका, शिळ्या भाजीचा इतका चविष्ट पराठा की खाणारेही म्हणतील लाजवाब...

स्वयंपाकघरात काम करताना गृहिणींना रोजचा पडणारा प्रश्न म्हणजे, 'उरलेल्या भाजीचं नेमकं काय करायचं?' अनेकदा दुपारची किंवा रात्रीची भाजी शिल्लक राहते आणि पुन्हा तीच भाजी खाण्यास घरातील अनेक मंडळी नाकं मुरडतात. अनेकदा जेवणानंतर काही भाज्या उरतात आणि दुसऱ्या दिवशी त्या खाण्याचा कंटाळा येतो. अनेकदा अंदाज चुकतो आणि भाजी उरतेच, ही उरलेली भाजी पुन्हा गरम करून खाणं म्हणजे अनेकांसाठी शिक्षाच वाटते. रात्रीची किंवा दुपारची भाजी उरली की ती पुन्हा गरम करून खाण्याऐवजी, अशावेळी 'वेस्ट मधून बेस्ट' करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या भाज्यांचे चविष्ट पराठे करणे... उरलेली भाजी वापरून पराठे बनवल्यामुळे अन्नाची नासाडी तर टाळतेच, पण मुलांनाही भाज्या खाऊ घालण्याचा हा एक सोपा मार्ग आहे(how to make paratha with leftover vegetables).

ताजी भाजी खाताना जेवढी मजा येते, त्यापेक्षा कितीतरी जास्त चव त्याच भाजीच्या 'पराठ्यामध्ये' दडलेली असते. मसाल्यांनी युक्त असलेली उरलेली भाजी जेव्हा पिठासोबत एकजीव होते आणि तव्यावर साजूक तुपात खरपूस भाजली जाते, तेव्हा त्याचा सुगंध घरभर दरवळतो. मग ती बटाट्याची भाजी असो किंवा रात्रीची  उरलेली डाळ; उरलेल्या अन्नातून उत्तम अशा चवीचा गरमागरम पराठा कसा करायचा याची सोपी ट्रिक पाहूयात. 'लेफ्टओव्हर मॅजिक' ही संकल्पना (leftover dry sabji paratha) सध्या खूप लोकप्रिय होत आहे. उरलेल्या भाजीमध्ये पिठामुळे पौष्टिकता वाढते आणि मुलांना एक नवीन पदार्थ खायला मिळतो. अशा कोणत्या भाज्या आहेत ज्यांचे पराठे सर्वात जास्त चविष्ट लागतात? उरलेल्या अन्नपदार्थांची नासाड़ी होऊ न देता किंवा वाया न घालवता (paratha from leftover sabji) त्याचे पराठे कसे करायचे याची नवीन ट्रिक पाहूयात... 

उरलेल्या भाज्या - डाळीचे पराठे करण्याची सोपी ट्रिक... 

१. बटाट्याची भाजी :- जर तुमची सुकी बटाट्याची भाजी उरली असेल, तर ती मॅश करून त्यात थोडी कोथिंबीर, ओवा आणि मीठ टाकून पिठात मळून घ्या किंवा पुरणासारखे भरून लाटा. अशाप्रकारचे आलू पराठे गरमागरम खायला चविष्ट लागतात. अशाच प्रकारे आपण मेथी - बटाटयाची सुकी भाजी उरली तरी देखील त्याचे याच प्रकारे पराठे करुन खाऊ शकतो. 

२. फ्लॉवर किंवा कोबीची भाजी :- फ्लॉवर किंवा कोबीची सुकी भाजी उरली असेल, तर ती चमच्याने नीट मॅश करा. कोबीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पिठात मिसळताना पाणी जपून वापरा. यामुळे पराठे खूप खुसखुशीत होतात. अशाचप्रकारे आपण उरलेल्या फ्लॉवरच्या सुक्या भाजीचे देखील तितकेच चविष्ट असे पराठे झटपट तयार करू शकता. 

घड्याळ लावून फक्त १० मिनिटांत करा पोह्यांचा ढोकळा, कापसारखा पांढराशुभ्र आणि मऊ-पाहा रेसिपी...

मिक्सरमध्ये करा कुळथाची मालवणी पिठी, गिरणीत जाण्याचीही गरज नाही-अस्सल पारंपरिक चवीची पिठी करा घरीच...

३. डाळ किंवा उसळ :- शिल्लक राहिलेली तुरीची डाळ किंवा मूग-मटकीची उसळ फेकून देऊ नका. पिठामध्ये ही डाळ/उसळ, थोडा गरम मसाला आणि चिरलेला कांदा घालून पीठ मळा. हे पराठे अतिशय पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त हेल्दी असतात.

४. पालेभाज्या :- उरलेली मेथीची किंवा पालकाची भाजी पिठात मळून त्याचे 'थेपले' किंवा पराठे बनवता येतात. यात थोडं बेसन आणि दही घातल्यास पराठे मऊ आणि चविष्ट लागतात.

५. मिक्स व्हेज किंवा कुर्मा भाजी :- मिक्स व्हेज भाजी उरली असेल तर ती मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या किंवा मॅशरने मॅश करा. त्यात थोडा चाट मसाला घालून कणकेत हे सारण भरुन पराठे लाटा.

ना कांदेपोहे ना मटारपोहे ना तर्रीपोहे आता खा चटणी पोहे! चमचमीत चवीचे असे पोहे एकदा खा-रोज कराल...

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. भाजी पिठात मिसळताना त्यात आधीच तिखट-मीठ असते, त्यामुळे जास्तीचे मसाले घालताना काळजी घ्या.

२. पराठे अधिक चविष्ट लागण्यासाठी त्यात थोडा ओवा आणि कसूरी मेथी नक्की घाला. 

३. हे पराठे दही, लोणचे किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

४. उरलेल्या भाज्यांचे पराठे करताना भाजी फार ओलसर असेल तर आधी थोडी परतून घ्या. त्यामुळे पराठे करताना पीठ चिकट होत नाही आणि पराठे मऊ व खुसखुशीत होतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Transform leftover vegetables into tasty parathas: Grandma's 5-minute hotel-style recipe.

Web Summary : Don't throw away leftover vegetables! Turn them into delicious and nutritious parathas. Use leftover potato, cauliflower, lentils, or leafy vegetable dishes. Mix with flour and spices, then cook until golden. A tasty way to reduce food waste and feed kids healthy meals.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स