Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पालक पनीर डोसा : शेफ कुणाल कपूर सांगतात स्पेशल सुपर हेल्दी रेसिपी, नाश्ता सुपरफास्ट

पालक पनीर डोसा : शेफ कुणाल कपूर सांगतात स्पेशल सुपर हेल्दी रेसिपी, नाश्ता सुपरफास्ट

How to Make Palak Paneer Dosa?: पालक पनीर भाजी म्हणून खूप वेळा खाल्ली असणार. पण आता पालक पनीर डोसा करून पाहा..(easy and simple recipe of palak paneer dosa)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2026 19:03 IST2026-01-29T12:46:32+5:302026-01-29T19:03:11+5:30

How to Make Palak Paneer Dosa?: पालक पनीर भाजी म्हणून खूप वेळा खाल्ली असणार. पण आता पालक पनीर डोसा करून पाहा..(easy and simple recipe of palak paneer dosa)

how to make palak paneer dosa, palak paneer dosa recipe by Kunal Kapoor, easy and simple recipe of palak paneer dosa  | पालक पनीर डोसा : शेफ कुणाल कपूर सांगतात स्पेशल सुपर हेल्दी रेसिपी, नाश्ता सुपरफास्ट

पालक पनीर डोसा : शेफ कुणाल कपूर सांगतात स्पेशल सुपर हेल्दी रेसिपी, नाश्ता सुपरफास्ट

बऱ्याचदा असं होतं की नाश्त्यासाठी काय वेगळं करावं हे कळत नाही. कारण नाश्त्यासाठी असं काहीतरी हवं असतं जे भरपूर पौष्टिक असेल, ज्यातून प्रोटीन्स आणि फायबरही चांगल्या प्रमाणात मिळतील आणि शिवाय जे चवीलाही चटपटीत असेल. अशा एखाद्या पदार्थाच्या शोधात असाल तर पालक पनीर डोसा ही रेसिपी करून पाहाच. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ही रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली असून ती करायला अतिशय सोपी आहे (easy and simple recipe of palak paneer dosa). शिवाय त्यासाठी खूप काही पुर्वतयारी करण्याची गरज नाही.(how to make palak paneer dosa?)

पालक पनीर डोसा रेसिपी 

 

छान मस्त ताजा पालक घ्या. तो व्यवस्थित धुवून घ्या. यानंतर गॅसवर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा. त्यात धुतलेला पालक घाला.

करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी

एखाद्या मिनिटाने पालक थोडा गरम झाला की गॅस बंद करा आणि गरम पाण्यातला पालक लगेचच थंड पाण्यात घाला. यामुळे पालकाचा हिरवा रंग जशासतसा टिकून राहातो.

 

हिरवे मुग आणि तांदूळ सम प्रमाणात घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यामध्येच भिजवून घेतलेला पालक घाला.

वेटलॉस करणाऱ्यांसाठी कियारा आडवाणीच्या डाएटिशियनचा महत्त्वाचा सल्ला, ३ चुका टाळा- झटपट वजन उतरेल..

आता डोशाला छान खमंग चव येण्यासाठी त्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडासा कांदा घाला. आता थोडंसं पाणी घालून हे मिश्रण अगदी बारीक करून घ्या. हे झालं डोसा बॅटर तयार. यामध्ये चवीनुसार मीठ घाला. 

 

डोशासाठी पनीरचं स्टफिंग तयार करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल, मोहरी, लाल मिरची, उडीद डाळ, कडिपत्ता घालून फोडणी करून घ्या. यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा, आलं- लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पनीर घालून चवीनुसार मीठ घाला. हे झाली पनीर स्टफिंग तयार.. 

अनुष्का शर्मा मुळीच खात नाही गहू आणि 'हे' पदार्थ, तिच्यासारखा फिटनेस हवा तर ३ गोष्टी शिकाच...

आता नेहमीप्रमाणे तयार केलेलं बॅटर तव्यावर घालून त्याचा डोसा करा. डोसा एका बाजुने होत आला की त्यावर पनीरचं स्टफिंग घालून सर्व्ह करा. छान कुरकुरीत पालक पनीर डोसा तयार.. 


 

Web Title : पालक पनीर डोसा: शेफ कुणाल कपूर की हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी

Web Summary : एक पौष्टिक और स्वादिष्ट नाश्ता खोज रहे हैं? पालक पनीर डोसा आजमाएं! शेफ कुणाल कपूर की आसान रेसिपी प्रोटीन और फाइबर से भरपूर है। डोसा के लिए पालक, दाल, चावल और मसाले मिलाएं। भरने के लिए पनीर को मसालों के साथ भूनें। आपके दिन की एक स्वस्थ और स्वादिष्ट शुरुआत।

Web Title : Palak Paneer Dosa: Chef Kunal Kapur's Healthy Breakfast Recipe

Web Summary : Looking for a nutritious and tasty breakfast? Try Palak Paneer Dosa! Chef Kunal Kapur's simple recipe is packed with protein and fiber. Blend spinach, lentils, rice, and spices for the dosa. Sauté paneer with spices for the filling. A healthy and delicious start to your day.