अनेकदा घरात आपण ओलं नारळ आणून ठेवतो. बरेच दिवस झाल्यानंतर हे नारळ सुकतात. अनेकदा पुजेचे नारळसुद्धा असतात. अशावेळी सुकलेले नारळ फेकून देण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीनं शुद्ध, सुगंधित नारळाचं तेल घरीच बनवू शकता. घरी तयार केलेलं तेल बरेच महिने खराब होत नाही. याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळेल इतका तीव्र आणि ताजा असतो. चेहऱ्याला तुम्ही हे तेल लावलं तर चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते. हे तेल त्वचा आणि केसांसाठी वापरणं उत्तम ठरतं. (How To Make Organic Coconut Oil From Dry Coconut In Mixer)
घरच्याघरी नारळाचं तेल कसं करावं?
कॅरीबीयन पॉट.कॉमनुसार सगळ्यात आधी जितके नारळ असतील ते फोटून आतलं खोबरं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. आपण भाजीसाठी कापतो तसेच हे छोटे तुकडे कापा किंवा किसून घ्या. नंतर २ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे नारळ थोडं मऊ पडेल आणि वाटायला सोपं जाईल. (Ref)
मिक्सरमध्ये नारळ कसे वाटावे?
सगळ्यात आधी १ कप नारळाचे तुकडे घ्या. त्यात थोडं फार पाणी घाला. मिक्सरमधून जितकं शक्य होईल तितकं बारीक दळून घ्या. जेणेकरून बारीक प्युरी तयार व्हायला हवी. नंतर एक सुती कॉटनचं कापड घेऊन त्यात ही प्युरी गाळून घ्या जेणेकरून सर्व दूध निघून जाईल. ही प्रक्रिया वारंवार करत राहा जोपर्यंत नारळातलं पूर्ण दूध निघून जात नाही तोपर्यंत करा. उरलेला नारळाचा जाडसर भाग फेकण्याची काही गरज नाही. तो सुकवून तुम्ही नारळाच्या पावडरप्रमाणे वापरू शकता.
नारळाच्या दुधापासून तेल कसे तयार करावे?
तुम्ही सुती कापडानं गाळून काढलेलं नारळाचं दूध १५ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दुधावर घट्ट साय आलेली दिसून येईल आणि खालचं पाणी वेगळं झालेलं दिसेल. वर जमा झालेली साय एका कढईत काढून गॅसवर ठेवा आणि मध्यम आचेवर उकळवून घ्या. ही प्रक्रिया दुधाच्या सायीपासून तूप काढण्यासारखीच आहे.
जवळपास १ तास मंद आचेवर शिजवल्यानंतर नारळाच्या सायीतून तेल पूर्णपणे बाहेर येईल. नंतर गाळणीच्या साहाय्यानं तेल वेगळं करून घ्या. कोणत्याही मशिनचा वापर न करता तुम्ही घरच्याघरी शुद्ध नारळाचं तेल बनवू शकता. ४ नारळातून जवळपासून ३०० ते ४०० ग्रॅम तेल निघू शकते. हे तेल स्वच्छ काचेच्या बाटलीत किंवा स्टिलच्या डब्यात ठेवू शकता.
Web Summary : Easily make pure coconut oil at home using dry coconut. Soak coconut pieces, grind, extract milk using cloth. Boil cream from milk to separate oil. This homemade oil is great for skin and hair.
Web Summary : सूखे नारियल का उपयोग करके घर पर आसानी से शुद्ध नारियल तेल बनाएं। नारियल के टुकड़ों को भिगोकर पीस लें, कपड़े का उपयोग करके दूध निकालें। तेल को अलग करने के लिए दूध से क्रीम उबालें। यह घर का बना तेल त्वचा और बालों के लिए बहुत अच्छा है।