Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यांच्या चटकदार नुडल्स करण्याची रेसिपी, मुलांना एवढ्या आवडतील की मैद्याच्या नुडल्स खाणंच विसरतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2026 13:46 IST

How to Make Noodles From Leftover Chapati?: पोळ्यांच्या नुडल्सची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा... मुलांसकट घरातल्या सगळ्यांनाचा आवडतील.(roti noodles recipe)

चमचमीत नूडल्स हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. बच्चे कपंनी तर या पदार्थाचे फॅन आहेत. एरवी पोळी- भाजी खायला त्यांना भूक नसते. पण नूडल्स समोर आल्या की मात्र त्यांची भूक भरपूर वाढते. पण नूडल्स मैद्याच्या असतात त्यामुळे त्या मुलांना वारंवार द्यायला नको वाटतं. म्हणूनच आता हा एक मस्त पर्याय पाहा. मुलांनी नूडल्स मागितल्या तर सरळ त्यांना घरात असणाऱ्या पोळ्यांच्या नूडल्स करून द्या (How to Make Noodles From Leftover Chapati?). या नूडल्स अतिशय चवदार होतात. शिवाय नूडल्स करताना त्यात भरपूर भाज्याही घाला (noodles from leftover roti). कधी कधी पोळ्या खूप उरल्या असतील तर कुस्करा करण्याऐवजी त्यांच्या नूडल्स करून खा.(roti noodles recipe)

 

पोळ्यांच्या नूडल्स कशा कराव्या?

पोळ्यांच्या नूडल्स करण्यासाठी सगळ्यात आधी तर पोळी सपाट पोळपाटावर किंवा चॉपिंग पॅडवर पसरवून ठेवा आणि सुरी घेऊन तिचे लांब लांब काप करा. साधारणपणे नूडल्सचा आकार जेवढा असतो त्यापेक्षा थोडे जाडसर काप करावे.

टरबूज घेता, पण ते पांचट निघतं? रसाळ, गोड टरबूजावर ‘या’ खुणा नक्की दिसतील, पाहून खरेदी करा

नूडल्स करण्यासाठी लसूण, आलं आणि मिरची यांची पेस्ट करून ठेवा. तसेच सिमला मिरची, कांदा, पत्ताकोबी या भाज्याही चिरून घ्या.

 

यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढईमध्ये तेल घालून कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी या भाज्या परतून घ्या. त्यानंतर आलं- लसूण पेस्ट घालून ती देखील परतून घ्या. लसुणाचा कच्चा वास गेल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस घाला आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्या.

भुवया खूप पातळ आहेत? ४ सोपे घरगुती उपाय, भुवया होतील जाड- चेहरा दिसेल रेखीव

यानंतर त्यामध्ये पोळीचे काप घाला. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्या. हा पदार्थ खूप शिजवू नका. पोळ्यांचे काप घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून जास्तीतजास्त ४ ते ५ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेली कांद्याची पात घालून गरमागरम नूडल्स सर्व्ह करा.. सगळ्यांनाच खूप आवडतील. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स