Join us

१ वाटी मूग डाळीच्या करा प्रोटीनयुक्त मऊसूत इडल्या; १० मिनिटांत होतील पौष्टीक इडल्या, सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:10 IST

How To Make Moong Dal Idli : मुगाची डाळ पचायलाही हलकी असते. रात्री मुगाची डाळ भिजवून सकाळी मऊसूत इडल्या करू शकता.

इडली (Idli) म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बरेचजण नाश्त्याला आवडीनं इडल्या खातात. इडली खाण्यासाठी डाळ-तांदूळ भिजवा ही झंझट असते. नेहमी त्याच पद्धतीची इडली न करता तुम्ही इडलीला थोडं पौष्टीक बनवण्यासाठी त्यात डाळींचा समावेश करू  शकता (How To Make Moong Dal Idli). मुगाची डाळ आपल्या प्रत्येकाच्याच घरी असते. (Moong Dal Idli Making Tips)

मुगाच्या डाळीच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. मुगाची डाळ पचायलाही हलकी असते. रात्री मुगाची डाळ भिजवून सकाळी मऊसूत इडल्या करू शकता. अशी इडली करणं एकदम सोपं आहे. मुगाच्या डाळीच्या इडल्यांची सोपी रेसिपी पाहूया. इडली तुम्ही चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता. (Moong Dal Idli Recipe) 

मुगाच्या डाळीच्या इडलीसाठी लागणारं साहित्य

१ कप मुगाची डाळ

१/२ कप पोहे

१ हिरवी मिरची (गरजेनुसार)

१ इंच आलं

१/२ चमचा जिरे

मीठ चवीनुसार

१/२ चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा

मुगाच्या डाळीची इडली करण्याची सोपी कृती

1) सर्वात आधी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि कमीत कमी ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा. पोहे देखील धुवून बाजूला ठेवा. भिजवलेली डाळ आणि पोहे मिक्सरमध्ये टाका. त्यात आलं, हिरवी मिरची आणि जिरे घालून बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास थोडं पाणी घाला, पण मिश्रण जास्त पातळ करू नका.

१ थेंबही तेल न वापरता करा टम्म फुगलेल्या पुऱ्या! ऑईल फ्री, पौष्टीक पुऱ्या करण्याची खास ट्रिक

2) तयार मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण साधारण १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.आता इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा. इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून ग्रीस करा.

3) मिश्रणात इनो किंवा सोडा घालून त्यावर एक चमचा पाणी टाका आणि मिश्रण एकाच दिशेने हलकेच ढवळा. मिश्रण फुगून हलकं होईल. हे मिश्रण लगेच इडलीच्या साच्यात घाला. इडली पात्रामध्ये साचे ठेवून झाकण लावा आणि मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे वाफवून घ्या.

गाडीवर मिळते तशी कुरकुरीत कांदाभजी घरीच करा; पिठात १ पदार्थ घाला, कमी तेलकट होईल भजी

4) इडली शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यात सुरी घालून बघा. सुरी स्वच्छ बाहेर आल्यास इडली तयार झाली आहे. गरमागरम मुगाच्या डाळीची इडली नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत खा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स