रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर हल्ली पंजाबी फूड जास्त प्रमाणात खाल्ले जाते. त्यातही मिक्स व्हेजसारख्या भाज्यांना जास्त मागणी असते. कारण लहान मुलांपासून मोठ्या मंडळींपर्यंत सगळ्यांनाच ती आवडते. मोठ्यांसाठी त्यात भरपूर भाज्याही असतात आणि छोट्या मुलांच्या आवडीप्रमाणे त्यात पनीरही असते. त्यामुळे सगळ्यांनाच आवडणारी मिक्स व्हेज तुम्हाला घरी करून पाहायची असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करा (Restaurant Style Mix Veg Recipe). तसंही आता हिवाळा असल्याने बाजारात भरपूर भाज्या मिळत आहेत त्यामुळे या दिवसांत तर भरपूर भाज्यांचं अस्सल पोषण देणारी मिक्स व्हेज करून खायलाच हवी..(how to make mix veg at home?)
मिक्स व्हेज रेसिपी
साहित्य
बीन्स, बटाटा, फ्लॉवर, सिमला मिरची, मटार आणि गाजर या भाज्यांचे काप २ वाट्या
पाव वाटी पनीरचे तुकडे आणि तेवढेच काजू
२ मध्यम आकाराचे कांदे आणि टोमॅटो
१ चमचा आलं, लसूण पेस्ट
जिरेपूड, कसुरी मेथी, गरम मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ
१ चमचा बटर आणि २ चमचे फ्रेश क्रिम
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये कांदे, टोमॅटो आणि काजू एकत्रित शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर हे पदार्थ मिक्सरमधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.
ओल्या हळदीचं ५ मिनिटांत होणारं चटपटीत पौष्टिक लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढेल
यानंतर कढईमध्ये तेल घालून त्यात आलं लसूण पेस्ट परतून घ्या. त्यामध्येच हळद, किचन किंग मसाला, कसूरी मेथी, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट असे सगळे मसाले घालून परतून घ्या. यानंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि काजूची प्युरी घालून ती ही परतून घ्या.
त्यानंतर उकडून किंवा परतून घेतलेल्या भाज्या आणि पनीर घालावे. चवीनुसार मीठ, फ्रेश क्रिम, बटर घालून सगळी भाजी हलवून घ्यावी आणि ५ मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. चमचमीत मिक्स व्हेज तयार.
