Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हाय..हाय कराल पण तोंडाला येईल चव, करा झणझणीत मिरचीचा ठेचा, १ सोपी युक्ती-ठेचा होईल मस्त

हाय..हाय कराल पण तोंडाला येईल चव, करा झणझणीत मिरचीचा ठेचा, १ सोपी युक्ती-ठेचा होईल मस्त

How To Make Mirchicha Thecha ( Green Chilly Thecha Recipe) : भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही ठेचा खाऊ शकता यामुळे तोंडाला चव येते आणि पोटही भरतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:36 IST2026-03-13T17:10:55+5:302026-03-13T17:36:41+5:30

How To Make Mirchicha Thecha ( Green Chilly Thecha Recipe) : भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही ठेचा खाऊ शकता यामुळे तोंडाला चव येते आणि पोटही भरतं.

How To Make Mirchicha Thecha : Maharashtrian Style Green Chilly Thecha Recipe | हाय..हाय कराल पण तोंडाला येईल चव, करा झणझणीत मिरचीचा ठेचा, १ सोपी युक्ती-ठेचा होईल मस्त

हाय..हाय कराल पण तोंडाला येईल चव, करा झणझणीत मिरचीचा ठेचा, १ सोपी युक्ती-ठेचा होईल मस्त

जेवणाला नेहमीच चपाती, भाजी, वरण-भात हे पदार्थ खाऊन  कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मिरचीचा झणझणीच ठेचा करू शकता. मिरचीचा ठेचा चवीला उत्तम असतो. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ठेचा खाऊ  शकता यामुळे तोंडाला चव येते आणि पोटही भरतं. ठेचा हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक जुना पदार्थ आहे. ग्रामीण भागात बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, ठेचा हे समीकरण आवडीनं खाल्ले जाते. (How To Make Mirchicha Thecha)

मिरचाचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य

 शेंगदाणे- अर्धा कप

 हिरव्या मिरच्या - ८ ते १० 

लसूण - ८ ते १०

 मीठ- १ टेबलस्पून

 तेल- ३ टेबलस्पून

मिरचीचा ठेचा करण्याची सोपी कृती

सगळ्यात आधी तव्यावर तेल  गरम करून त्यात लसूण आणि शेंगदाणे घालून परतवून घ्या. यात हिरव्या मिरचीचे तुकडेही घाला.

 वरील परतून घेतलेले  साहित्य डिशमध्ये काढून थंड होऊ द्या. नंतर यात मीठ घाला.

थंड झालेले हे मिश्रण खलबत्त्यात घालून जाडसर कुटून घ्या. कढईत १ टेबलस्पून तेल घाला आणि वरील बारीक केलेले मिश्रण यात भरून २ ते ३ मिनिटं परतवून घ्या. यात तुम्ही आवडीनुसार लिंबूसुद्धा घालू शकता.

तयार आहे मिरचीची झणझणीत ठेचा. हा ठेचा तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता.


ठेचा वेगळ्या पद्धतीनं कसा करतात?

मिरचीच्या ठेच्याचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही आपल्या आवडीनुसार ठेचा बनवू शकता.  ज्यांना खूप तिखट आवडत नाही त्यांनी ठेच्यात शेंगदाणे जास्त घालावेत. हा ठेचा चवीला थोडा फ्रेश लागतो. कोथिंबीरीमुळे ठेच्याचा रंग गडद हिरवा येतो आणि चवीत वेगळेपण जाणवते.

काही लोक तिखटपणा कमी करण्यासाठी ठेच्यात दही घालतात. लिंबू आणि साखर घातलेला आंबट-गोड, तिखट ठेचा मिश्र चवीचा असतो. ज्यामुळे त्याची चव अधिक खुलते. लाल मिरची आणि लसूण वाटून केलेला ठेचासुद्धा भाकरीसोबत खायला उत्तम लागतो. यात काहीजण साखरसुद्धा  घालतात त्यामुळे चव चांगली येते.

Web Title : मसालेदार मिर्च ठेचा रेसिपी: उत्तम स्वाद के लिए एक सरल उपाय।

Web Summary : नियमित भोजन से ऊब गए हैं? मसालेदार मिर्च ठेचा बनाएं! यह पारंपरिक महाराष्ट्रीयन व्यंजन भाकरी या रोटी के साथ बहुत अच्छा लगता है, जो एक स्वादिष्ट और संतोषजनक भोजन प्रदान करता है। एक अनोखे स्वाद के लिए मूंगफली, धनिया या दही के साथ अनुकूलित करें।

Web Title : Spicy Chili Thecha Recipe: A simple trick for perfect taste.

Web Summary : Tired of regular food? Make spicy chili thecha! This traditional Maharashtrian dish pairs perfectly with bhakri or roti, offering a flavorful and satisfying meal. Customize with peanuts, coriander, or yogurt for a unique taste.