Join us

फक्त १५ मिनिटांत करा आप्पेपात्रात मिनी मँगो केक, शाळेच्या डब्यासाठी खास रेसिपी- शाळेची सुरुवात आनंदात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 12:18 IST

How To Make Mini Mango Cake At Home : Mini Mango Cake in less than 10 mins : Mango appam cake in appe pan : Appe pan cake recipes : मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी किंवा टी - टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही हे मिनी मँगो केक खाऊ शकता.

आंब्याचा सिझन आला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं आंबे खाण्याची उत्सुकता लागते. आपल्यापैकी सगळ्यांच्या घरात या सिझनमध्ये हमखास आंब्याची पेटी आणली जाते. आंब्याच्या पेटीतील आंबे ( Mini Mango Cake in less than 10 mins) तर आपण खातोच, सोबतच या आंब्यांचे वेगवेगळे पदार्थ देखील घरोघरी (Mango appam cake in appe pan) तयार करून त्यावर ताव मारला जातो. असाच एक आंब्याचा झटपट आणि इन्स्टंट करता येणारा पदार्थ म्हणजे, मिनी मँगो केक. मिनी मँगो केक तयार करण्यासाठी फारसे साहित्य किंवा खूप मोठा घाट घालावा लागत नाही(How To Make Mini Mango Cake At Home).

घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात अगदी झटपट तयार करता येणारे हे मिनी मँगो केक सगळ्यांनाच खायला आवडतील. विशेष म्हणजे मायक्रोव्हेव नसेल तरी देखील, आप्पे तयार करण्याच्या भांड्यात हा केक अगदी पटकन तयार करता येतो. आप्प्याच्या भांड्यात झटपट तयार होणारा मिनी मँगो केक ही एक अशी हटके आयडिया आहे की, आपण अगदी काही मिनिटांत चविष्ट केक तयार करून खाऊ शकतो. मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी किंवा टी - टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही हे मिनी मँगो केक खाऊ शकता.    

 साहित्य :- 

१. दूध - १/२ कप २. पिठीसाखर - १/२ कप ३. आंब्याचा पल्प - १/२ कप ४. तेल - १/४ कप ५. मैदा - १ कप ६. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून ७. बेकिंग सोडा - १/४ टेबलस्पून ८. पिवळा खाण्याचा रंग - ३ ते ४ थेंब ९. लिंबाचा रस - १/२ टेबलस्पून 

मुलांना पिझ्झा आवडतो ना, करा हट्ट पूर्ण! पाहा पौष्टिक ओट्स पिझ्झा - खाऊ द्या पोटभर...

पाऊस स्पेशल बेत: गरमागरम टोमॅटो सार आणि वाफाळता भात! पाहा टोमॅटो सारची पारंपरिक रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी एक आंबा स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून त्याचा पल्प तयार करून घ्यावा. २. एका मोठ्या बाऊलमध्ये दूध, पिठीसाखर, आंब्याचा पल्प, तेल असे सगळे एकत्रित घेऊन, चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. यात आपण आपल्या आवडीनुसार खायचा पिवळा रंग देखील ३ ते ४ थेंब घालू शकतो. मग या मिश्रणात थोडा चवीनुसार लिंबाचा रस देखील घालावा. 

सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

३. या तयार मिश्रणाच्या बॅटरवर एक बारीक जाळीची गाळणी धरून त्यात मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून चाळून घ्यावे. आता सगळ्यात शेवटी हे सगळे मिश्रण चमच्याने एकत्रित कालवून केक बॅटर तयार करून घ्यावे. ४. आता आप्पे तयार करायचे भांड घेऊन त्यात हे सगळे बॅटर चमच्याने ओतून घ्यावे. ५. गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर एक पॅन ठेवून त्या पॅनवर हे आप्प्याचे भांड ठेवून द्यावे. भांड झाकून मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे ठेवून हे मिनी केक आप्प्याच्या भांड्यात बेक करून घ्यावेत.      

आप्प्याच्या भांड्यात तयार केलेले इन्स्टंट मिनी मँगो केक खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृतीआंबाफळेलहान मुलं